चाळीस वर्षे दारात कोणीच आले नाही..
◻️आमदार खताळ यांनी तीन ते चार वेळा येऊन मन जिंकले
संगमनेर LIVE | आमोल खताळ आमदार झाल्यापासून तीन-चार वेळा तरी आमच्या घरच्या दारी आले. आमच्याकडे बसले, आमची काळजी घेतली, आणि पाया देखील पडले. एवढा साधा, एवढा आपुलकीचा आमदार आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. शहरातील एका वयोवृद्ध महिलेनं व्यक्त केलेल्या या भावना संगमनेरच्या अनेकांच्या मनात खोलवर उमटत आहेत.
आजवर कधीही न अनुभवलेली लोकाभिमुखता आणि योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळत असल्याने सर्वसामान्य नागरिकही समाधान व्यक्त करत आहेत. त्यामुळेच आमदार अमोल खताळ यांच्या कामाच्या पद्धतीचा, साधेपणाचा आणि लोकांशी मनाने जोडण्याच्या वृत्तीचा शहरात सातत्याने गौरव केला जात आहे. महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी आमदार खताळ शहरातील विविध प्रभागांत फिरत आहेत. त्यांच्या या दौऱ्यांदरम्यान वयोवृद्ध त्यांना भेटतात, त्यांच्या हातात हात धरून त्यांना आशीर्वाद देतात.
गेल्या वर्षभरात त्यांनी केलेल्या कामाचे अनेक जण तोंडभरून कौतुक करताना दिसतात. राबवलेल्या योजनांचा लाभ खऱ्या अर्थाने नागरिकांपर्यंत पोहोचत असल्याचे जनतेला जाणवू लागले आहे.भविष्यात संगमनेर शहर हे विकासाचे मॉडेल बनवायचे आहे, असा ठाम निर्धार आमदार खताळ सातत्याने व्यक्त करतात, आणि त्यांच्या कामांमधूनही तो स्पष्ट दिसतो.
शहराचा विकास, तरुणांना संधी, वयोवृद्धांना आधार या तिन्ही स्तरांवर त्यांनी केलेली मेहनत लोकांच्या विश्वासात भर घालत आहे. विशेष म्हणजे, तरुणांमध्येही अमोल खताळ यांची लोकप्रियता लक्षणीयरीत्या वाढली आहे. साधेपणा, जमिनीवरची माणुसकी, आणि समस्या ऐकून त्वरित प्रतिसाद देण्याची वृत्ती या गुणांमुळे तरुणाई त्यांना एका ‘अपेक्षित बदलाचं प्रतीक’ मानू लागली आहे.
दरम्यान, आमदार अमोल खताळ यांचा साधेपणा आणि त्यांची लोकाभिमुख वृत्ती खऱ्या अर्थाने अनेकांच्या हृदयाला स्पर्शून जात आहे. गाड्यांचा ताफा न ठेवता सर्वसामान्य माणसात मिसळत फिरणारा, पायापुढे वाकून माणसांची मनं जिंकणारा नेता अशी त्यांची प्रतिमा आज संगमनेरमध्ये अधिक मजबूत होत आहे. संगमनेरकरांच्या शब्दांत सांगायचे तर अमोल खताळ हे फक्त आमदार नाहीत. ते आमच्यातलेच एक माणूस आहेत असेही नागरिक म्हणत आहे.