संगमनेरच्या विकासासाठी परिवर्तनाची नवी हाक!

संगमनेर Live
0
संगमनेरच्या विकासासाठी परिवर्तनाची नवी हाक!

◻️ सुवर्णा खताळ यांना महिलांचा प्रचंड प्रतिसाद

संगमनेर LIVE | संगमनेरच्या राजकारणात परिवर्तनाची नवी लाट शहरभर उसळली असून, ज्या विश्वासाने तुम्ही विधानसभा निवडणुकीत परिवर्तन घडवून आमदार अमोल खताळ यांची निवड केली, त्याच उमेदेने नगरपरिषदेतील परिवर्तनही घडवा, अशी भावनिक हाक शिवसेना (शिंदे गट) नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुवर्णा खताळ यांनी मतदारांना दिली. केंद्रात आणि राज्यात महायुतीची सत्ता असताना संगमनेरच्या विकासासाठी सुवर्ण संधी उपलब्ध असून, हा विकास घराघरात पोहोचवण्यासाठी महायुतीचे उमेदवार निवडले गेले पाहिजेत, असा ठाम विश्वास त्यांनी शहर दौऱ्यात व्यक्त केला.

प्रभागनिहाय भेटीत सुवर्णा खताळ यांनी घराघरात जाऊन सर्वांचे प्रश्न मनापासून ऐकले. त्यांच्या संवादात महिलांनी दिलेला उत्स्फूर्त आणि आत्मीय प्रतिसाद इतका भावनिक होता की अनेक ठिकाणी महिलांनी आम्हाला खरा विकास हवा आहे. आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशी थेट भूमिका देखील मांडली. शहरातील अनेक भागात महिलांनी सुवर्णा खताळ यांच्यासोबत फिरत आपल्या समस्या, अडचणी, अपेक्षा स्वतःहून मांडल्या. त्यांना मिळालेला हा प्रतिसाद महायुतीच्या प्रचारात उर्जा आणणारा ठरतो आहे.

अवघ्या एका वर्षात शहरातील विकासकामांची दिशा बदलणारे आमदार अमोल खताळ यांच्याबद्दलही प्रतिसाद अत्यंत सकारात्मक मिळाल्याचे सुवर्णा खताळ यांनी सांगितले. कधीच न झालेली कामे, वर्षानुवर्षे रखडलेले प्रश्न, आणि शहरासाठी महत्वाच्या प्रकल्पांना गती हे सर्व आमदार अमोल खताळ यांनी अशक्य ते शक्य करून दाखवले अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली. त्यामुळेच नागरिकांच्या मनात ‘परिवर्तनाचा विश्वास’ अधिक दृढ झाल्याचे त्यांनी नमूद केले.

संगमनेरमधील महिलांचे प्रश्न आपल्याला रोजच्या आयुष्याला स्पर्श करणारे आहेत. शहरातील सुरक्षा, स्वच्छता, आरोग्य सुविधा, रोजगार, स्वयंसहाय्यता गटांचे बळकटीकरण या सर्व क्षेत्रांत आम्ही ठोस काम करणार आहोत. महिलांचा सहज आणि मुक्त संवाद त्यांच्यापर्यंत पोहोचत असल्याने, त्या प्रत्येक समस्या प्राधान्याने सोडवण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला. 

आपल्या संवादाच्या शेवटी त्यांनी पुन्हा एकदा यावर भर दिला की, आज संगमनेरला विकासाच्या दिशेने वेगाने पुढे न्यायचे असेल, तर राज्य-केंद्रातील महायुतीसोबत शहरातील सत्ता देखील महायुतीकडे असणे अत्यावश्यक आहे. तुम्ही दिलेली साथ आम्हाला संगमनेरचे भविष्य उज्ज्वल करण्याची ताकद देईल. संगमनेरमध्ये वातावरण हळूहळू तापत असले तरी सुवर्णा खताळ यांना महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे अनेकजण सागंत आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !