संगमनेर २.० अंतर्गत महिलांसाठी चांगले काम करणार - डॉ. मैथिलीताई तांबे
◻️ महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असल्याची ग्वाही
संगमनेर LIVE | सौ. दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वात स्वच्छ संगमनेर व सुंदर संगमनेर ही संकल्पना अत्यंत चांगली राबवली गेली. मात्र मागील चार वर्षामध्ये प्रशासक राज असल्याने विकास कामात अनेक अडथळे निर्माण झाले. स्वच्छ संगमनेर सुंदर संगमनेर आणि वैभवशाली संगमनेर बनवण्यासाठी संगमनेर २.० अंतर्गत काम करण्यात येणार असून महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचे डॉ. मैथिलीताई तांबे यांनी म्हटले.
संगमनेर शहरात विविध प्रभागांमध्ये संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या प्रचारात नागरिकांच्या भेटीगाठी दरम्यान त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना डॉ. मैथिलीताई तांबे म्हणाल्या की, लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहरात विकासाच्या खूप योजना राबवल्या आहेत. संगमनेर शहरातील नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळत आहे. सर्व धर्म समभाव, विकासाचे संगमनेर ही संगमनेर शहराची ओळख आहे.
सौ. दुर्गाताई तांबे यांनी शहरांमध्ये वृक्षारोपण संवर्धन याचबरोबर कचरा व्यवस्थापनामध्ये मोठे काम केले. स्वच्छ संगमनेर सुंदर संगमनेर हरित संगमनेर हा नारा देऊन संगमनेरला विविध पारितोषिक मिळून दिले. यामध्ये नागरिकांचा मोठा सहभाग घेतला. तोच वारसा जपत सर्वसामान्य कुटुंबांच्या विकासाकरता आपण काम करणार असून महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणार आहे.
याचबरोबर आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेर २.० या जाहीरनामे अंतर्गत अनेक नवीन संकल्पना राबविण्याचे निश्चित केले आहे. संगमनेर शहरातील राजकारण विरहित सर्व नागरिकांना बरोबर घेऊन या संकल्पना तडीस मिळण्यासाठी आपण काम करणार आहोत. याचबरोबर सर्व कामांमध्ये नागरिकांचा सहभाग राहील यासाठी आपला पहिला प्रयत्न असेल असेही सौ. डॉ. मैथिलीताई तांबे यांनी म्हटले आहे.
डॉ. मैथिलीताई तांबे यांना महिलांची मोठी साथ..
डॉ. मैथिलीताई तांबे या उच्चशिक्षित असून अत्यंत शांत, संयमी आहेत. प्रत्येक प्रश्न समजून घेऊन प्रत्येकाला मदत करण्याचा त्यांचा स्वभाव आहे आणि यामुळे महिलांबरोबर संगमनेर शहरांमधील नागरिकांना हक्काचे नेतृत्व मिळणार असल्याने शहरातील सर्व महिला भगिनी डॉ. तांबे यांच्या पाठीशी एकवटल्याचे चित्र आहे.