संगमनेरचे ग्रामीण रस्ते होणार 'सुपरफास्ट' २.६५ कोटींचा निधी मंजूर

संगमनेर Live
0
संगमनेरचे ग्रामीण रस्ते होणार 'सुपरफास्ट' २.६५ कोटींचा निधी मंजूर

◻️ आमदार अमोल खताळ यांची माहिती 


संगमनेर LIVE | महायुती सरकारच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील विकासकामांसाठी आमदार अमोल खताळ यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. राज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाकडून तालुक्यासाठी तब्बल २ कोटी ६५ लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे ग्रामीण भागातील प्रमुख रस्ते आता सुपरफास्ट होणार असून, २०२५-२६ या आर्थिक वर्षात ही सर्व कामे पूर्णत्वास जातील, अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.

​या निर्णयामुळे २१ गावांना दिलासा..

​'लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे' या योजनेंतर्गत हा निधी मंजूर झाला आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात ठिकठिकाणी रस्त्यांची समस्या गंभीर बनली होती, त्या अनुषंगाने हा निर्णय ऐतिहासिक ठरणार आहे.

​या प्रमुख विकासकामांव्यतिरिक्त समनापूर येथील मारुती मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी तसेच मेंढवन येथील दशक्रिया घाटावर सभामंडप बांधण्याच्या कामासाठी प्रत्येकी १० लाख रुपयांच्या निधीलाही मंजूरी मिळाली आहे.

​तालुका विकासाच्या धोरणाला गती..

​तालुक्याच्या ग्रामीण विकास धोरणाला गती देण्यात आमदार अमोल खताळ यांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. राज्य शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ संगमनेर तालुक्याला मिळावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत. या महत्त्वपूर्ण निधीसाठी आमदार खताळ यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे विशेष आभार मानले.

​“महायुती सरकारकडून मिळालेल्या निधीमुळे तालुक्यातील अनेक वर्षापासूनची प्रलंबित कामे आता पूर्ण होणार आहेत. शासनाच्या योजना फक्त कागदावर न राहता त्या प्रत्यक्षात उतराव्यात, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मंजूर कामे तातडीने आणि चांगल्या दर्जाची केली जातील, याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. या नव्या कामांमुळे नागरिकांच्या आयुष्यात अधिक सुलभता येईल, असा मला विश्वास आहे." अशी प्रतिक्रिया आमदार अमोल खताळ यांनी दिली.

मंजूर कामांचा तपशील..

घुलेवाडी लॉ कॉलेज ते एकता चौक येथे रस्ता मजबुतीकरण ३० लाख रुपये 

पिंपळे गावठाण ते कोटकर वस्ती रस्ता मजबुतीकरण/काँक्रीटीकरण २५ लाख रुपये 

वडझरी बु।। बोडखे वस्ती ते धनगरवाडा रस्ता मजबुतीकरण १० लाख रुपये 

गुंजाळ वाडी शिपणकर गल्ली ते दूमणे वस्ती (लक्ष्मी नगर) रस्ता कॉक्रीटीकरण १० लाख रुपये

दरेवाडी पाझर तलाव ते गायकवाड वस्ती येथे रस्ता मजबुतीकरण १० लाख रुपये

चिकणी रायदुर्ग परिसर येथे रस्ता मजबुतीकरण १० लाख रुपये

धांदरफळ बु।। डेरेवाडी फाटा ते शीतल ओढा येथे कॉक्रीटीकरण रस्ता १० लाख रुपये 

निमगाव भोजपूर किरण कडलग ते सुनील बांगर वस्ती रस्ता मजबुतीकरण/कॉक्रीटीकरण १० लाख रुपये 

गुंजाळ वाडी हॉटेल गॅलेक्सी ते कमलेश तिवारी वस्ती रस्ता मजबुतीकरण/काँक्रीटीकरण १० लाख रुपये 

मंगळापूर गावठाण ते महादेव मंदिर येथे रस्ता काँक्रीटीकरण १० लाख रुपये 

मालदाड शेलार वस्ती गोफणे वस्ती येथे रस्ता मजबुतीकरण/कॉक्रीटीकरण १० लाख रुपये 

रणखांब गावठाण ते मनसुख वस्ती येथे रस्ता मजबुतीकरण/काँक्रीटीकरण १० लाख रुपये 

रायते प्रवरा पूल ते परसराम काळे वस्ती येथे रस्ता कॉक्रीटीकरण १० लाख रुपये 

देवगाव गावठाण ते नालकर वस्ती येथे रस्ता मजबुतीकरण/कॉक्रीटीकरण १० लाख रुपये 

करुले निळवंडे शिव रस्ता येथे रस्ता मजबुतीकरण/काँक्रीटीकरण १० लाख रुपये 

शिरसगाव गावांतर्गत रस्ता मजबुतीकरण आणि काँक्रीटीकरण १० लाख रुपये 

पारेगाव खुर्द गावांतर्गत रस्ता मजबुतीकरण आणि काँक्रीटीकरण १० लाख रुपये 

अंभोरे गावांतर्गत रस्ता मजबुतीकरण/काँक्रीटीकरण १० लाख रुपये 

गुंजाळवाडी लक्ष्मी स्टील ते टाकेश्वर मंदिर (हासे पाटील इस्टेट) रस्ता मजबुतीकरण/काँक्रीटीकरण १० लाख रुपये 

इतर कामे समनापूर - मारुती मंदिर परिसर सुशोभीकरण १० लाख रुपये 

इतर कामे मेंढवन - दशक्रिया घाट येथे सभामंडप बांधणे १० लाख रुपये 

इतर कामे वडगाव पान फाटा - ग्रामपंचायतीच्या मोकळ्या जागेत सभामंडप बांधणे १० लाख रुपये 

इतर कामे - गावठाण ते बिरोबा मळा रस्ता मजबुतीकरण/काँक्रीटीकरण १० लाख रुपये
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !