कर्जतचा युग अक्षय मेहेर ५०० स्पर्धकांना मागे टाकत ठरला ‘नंबर १’

संगमनेर Live
0
कर्जतचा युग अक्षय मेहेर ५०० स्पर्धकांना मागे टाकत ठरला ‘नंबर १’

◻️ बोटांवर गणितं आणि हातात ट्रॉफी! कर्जतच्या शिरपेचात मानाचा तुरा!


संगमनेर LIVE (​कर्जत) | इन्स्पायर अबॅकस अकॅडेमीच्या वतीने आयोजित नॅशनल लेव्हल अबॅकस स्पर्धेत कर्जतच्या युग अक्षय मेहेर याने देदीप्यमान यश संपादन केले आहे. त्याने १ पी लेव्हलमध्ये (1P Level) चॅम्पियन ट्रॉफी पटकावून आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवून दिली.

​रविवार, दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी अहिल्यानगर येथील स्वस्तिक लॉन्समध्ये ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत पुणे, अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यांतील ५०० हून अधिक विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता. या अटीतटीच्या स्पर्धेत युगने आपल्या वेगवान आकडेमोडीने सर्वाना अचंबित केले.

​युग मेहेरने केवळ पाच मिनिटांत बोटांवर आकडेमोड करत १०० पेक्षा जास्त गणिते अत्यंत अचूकतेने सोडवली. त्याच्या या वेगवान कामगिरीने परीक्षक आणि उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. अबॅकस पद्धतीमुळे गणितातील कठीण आकडेमोड किती सोपी होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण युगने सादर केले.

​“अबॅकसमुळे विद्यार्थ्यामध्ये वेग, अचूकता आणि आत्मविश्वास वाढतो. शालेय परीक्षेतही याचा मोठा फायदा होतो.” यामुळे स्पष्ट झाले आहे.

​युगच्या या यशात कर्जत येथील इन्स्पायर अबॅकस अकॅडेमीच्या शिक्षिका सौ. केसकर कोमल शिवाजी यांचे मोलाचे योगदान आहे. गेल्या दोन वर्षापासून त्या कर्जतमध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन माध्यमातून अतिशय प्रभावीपणे ही अकॅडेमी चालवत आहेत. त्यांच्या सोप्या आणि तंत्रशुद्ध शिकवणीमुळेच युगसारख्या अनेक विद्यार्थ्याना गणिताची गोडी लागली आहे.

युगची​ मेहनत आणि शिक्षकांचे योग्य दिशादर्शन यामुळेच हे यश मिळाल्याचे बोलले जात आहे. युग मेहेरच्या या यशाबद्दल कर्जत परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भावी आयुष्यासाठी त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत. अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार योगेश रातडीया यांनी कळविली आहे.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !