प्रत्येक गाव ‘सौरग्राम’ करण्यासाठी उपाययोजना करा - नामदार विखे पाटील

संगमनेर Live
0
प्रत्येक गाव ‘सौरग्राम’ करण्यासाठी उपाययोजना करा - नामदार विखे पाटील

◻️ आश्‍वी पंचक्रोशीतील उंबरी बाळापूर, रहिमपूर, कोल्हेवाडी, शिबलापूर गावातील उपाय योजनाचा घेतला आढावा

◻️ सरकारी मोकळ्या जागांवर सौर प्रकल्प उभारण्याचे दिले निर्देश


संगमनेर LIVE (आश्‍वी) | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारच्या सौर उर्जेच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. गावातील शासनाच्या मोकळ्या जागांचा उपयोग करून सौर पॅनाॅल उभारणीसाठी प्रस्ताव तयार करावेत. प्रत्येक गाव सौरग्राम करण्याच्या दृष्टीने पुढाकार घेण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.

संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर, रहिमपूर, कोल्हेवाडी या गावात अतिवृष्टीने नूकसान झालेल्या भागाची पाहाणी केल्यानंतर याबाबतच्या उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. याबाबत झालेल्या कार्यवाहीचा तसेच अन्य विषयांचा आढावा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतला. प्रातांधिकारी अरूण उंडे, जलसंपदा विभागाचे स्वप्निल काळे, सार्वजिनक बांधकाम विभागाचे श्रीनिवास वर्पे, वीज वितरण कंपनीचे अभियंता वटमवार यांच्यासह जलसंधारण वीज वितरण कंपनीचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

ग्रामीण भागातील वीजेचा प्रश्न सोडविण्यासाठी महायुती सरकारने सौर उर्जा धोरणाची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू केली आहे. आपल्या भागातही प्रत्येक गाव सौरग्राम करण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी नियोजन करावे. यासाठी शासनाच्या मोकळ्या जागांचा उपयोग सोलर पॅनलच्या उभारणीसाठी उपयोगात आणता येण्याबाबत विचार करावा. वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून शिबलापूर येथे उभारण्यात येत असलेल्या सबस्टेशनच्या कामाची माहीती मंत्री विखे पाटील यांनी जाणून घेतली.

अतिवृष्टीने नूकसान झालेल्या भागाची पाहाणी करताना प्रामुख्याने गावातील ओढे-नाले आणि चरांवर मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिक्रमणाची गंभीर बाब निदर्शनास आली होती. सदर अतिक्रमण तातडीने काढून टाकण्याच्या सूचना मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. याबाबत झालेल्या कार्यवाहीचा आढावा घेताना संबधित शेतकरी ग्रामस्थ यांच्याशी संपर्क आणि संवाद साधून सर्व ओढे-नाले आणि चर अतिक्रमण मुक्त करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

याबाबत जलसंपदा जलसंधारण या दोन्ही विभागांनी तयार केलेल्या आराखड्याची माहीती त्यांनी जाणून घेतली. निळवंडे कालव्याच्या कामाबाबतही मंत्री विखे यांनी बैठकीत विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा बैठकीत भंडारदरा धरणाच्या डाव्या उजव्या कालव्याच्या कामासाठी १५० कोटी रुपयांचा निधीला मंजूरी दिली आहे. या कामाला गती देवून निर्धारीत वेळेत काम पूर्ण होण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले.

अतिक्रमाणामुळे बहुतांशी गावातील रस्त्यांच्या प्रश्न गंभीर झाला आहे. याबबात सार्वजिनक बांधकाम विभागाने सुध्दा रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले.

ग्रामीण भागातील वीजेचा प्रश्न सोडविण्यासाठी महायुती सरकारने सौर उर्जा धोरणाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यास प्रारंभ केला आहे. आपल्या भागातही प्रत्येक गाव सौरग्राम करण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी नियोजन करावे. यासाठी शासनाच्या मोकळ्या जागांचा उपयोग सोलर पॅनलच्या उभारणीसाठी उपयोगात आणता येण्याबाबत विचार करावा. 

दरम्यान वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून शिबलापूर येथे उभारण्यात येत असलेल्या सबस्टेशनच्या कामाची माहीती मंत्री विखे पाटील यांनी जाणून घेतली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !