महागड्या उपचारांना पूर्णविराम; ‘एसएमबीटी’चा आरोग्यसेवेत राष्ट्रीय गौरव!

संगमनेर Live
0
महागड्या उपचारांना पूर्णविराम; ‘एसएमबीटी’चा आरोग्यसेवेत राष्ट्रीय गौरव!

◻️ ​नाशिकच्या ‘एसएमबीटी' हॉस्पिटलला राष्ट्रीय 'NABH' मानांकन देऊन सन्मान 


​संगमनेर LIVE (नाशिक) | आरोग्यसेवा जितकी उत्तम, तितकीच ती महागडी असते, हा समज आता नाशिकच्या एसएमबीटी (SMBT) हॉस्पिटलने खोटा ठरवला आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे चॅरिटेबल हॉस्पिटल असलेल्या 'एसएमबीटी'ला नुकतेच राष्ट्रीय स्तरावरील NABH (National Accreditation Board for Hospitals & Healthcare Providers) मानांकन प्राप्त झाले आहे. रुग्ण सुरक्षा, क्लिनिकल क्वालिटी आणि पारदर्शक उपचार पद्धतीसाठी दिला जाणारा हा राष्ट्रीय गौरव असून, जागतिक दर्जाची सेवा परवडणाऱ्या दरातही मिळू शकते, हे या निमित्ताने सिद्ध झाले आहे.

​एसएमबीटी हॉस्पिटलने प्राप्त केलेले हे यश अनेक अर्थानी वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे. मुंबई, पुणे किंवा नागपूरसारख्या महानगरातील मोजकीच नामांकित मेडिकल कॉलेज हॉस्पिटल्स ज्या श्रेणीत येतात, त्या रांगेत आता नाशिकचे एसएमबीटी हॉस्पिटल जाऊन बसले आहे. ग्रामीण भागाच्या उंबरठ्यावर असूनही या हॉस्पिटलने महानगरांच्या तोडीची गुणवत्ता राखली असून, जागतिक दर्जाचे बदल करत असताना त्याचा कोणताही आर्थिक भार रुग्णांवर पडू दिला नाही. 

सरकारी योजना, चॅरिटेबल सपोर्ट आणि संस्थात्मक सवलतींच्या माध्यमातून येथे अत्यल्प दरात किंवा मोफत उपचार केले जातात. विशेष म्हणजे, टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि इम्म्युनोअँक्ट सारख्या नामांकित संस्थांशी करार असल्याने अत्यंत प्रगत उपचार आता स्थानिक पातळीवर उपलब्ध झाले आहेत. समृद्धी महामार्गावर वसलेले हे १२०० बेड्सचे भव्य हॉस्पिटल आज उत्तर महाराष्ट्राची खरी 'लाईफलाईन' ठरत असून, दररोज ८०० ते १००० रुग्णांना बाह्यरुग्ण विभागात सेवा दिली जात आहे.

​“ग्रामीण भागातील रुग्णाच्या प्रवेशापासून ते डिस्चार्जपर्यंतची प्रत्येक प्रक्रिया आम्ही पारदर्शक केली आहे. क्लिनिकल ऑडिट आणि सततच्या प्रशिक्षणाद्वारे उपचारांचा दर्जा खाजगी कॉर्पोरेट हॉस्पिटल्सपेक्षाही उंचावण्याचा आमचा प्रयत्न आहे.” असे डॉ. मीनल मोहगावकर (अधिष्ठाता, एसएमबीटी हॉस्पिटल) यांनी सांगितले.

​“एसएमबीटीचा विस्तार होत असून येत्या वर्षभरात सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण असे स्वतंत्र 'कॅन्सर हॉस्पिटल' सेवेत दाखल होईल. यामध्ये टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली पेट स्कॅन आणि रेडिएशन थेरपीची सुविधा उपलब्ध होईल.” असे सचिन बोरसे (सीओओ, एसएमबीटी हॉस्पिटल) यांनी सांगितले.

​भविष्यातील पाऊल: ‘नर्सिंग एक्सलन्स’ आणि ‘डिजिटल’ झेप

​रुग्णसेवेचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी येत्या वर्षभरात 'नर्सिंग एक्सलन्स' आणि 'डिजिटल NABH' मानांकन प्राप्त करण्याचे उद्दिष्ट हॉस्पिटल प्रशासनाने ठेवले आहे. शिकाऊ डॉक्टर किंवा उपचारांत दिरंगाई यांसारख्या गैरसमजांना छेद देत, इन्फेक्शन कंट्रोल आणि क्वालिटी ऑडिटमध्ये एसएमबीटीने बाजी मारली आहे.

​दरम्यान या यशाबद्दल हॉस्पिटलची ऑपरेशन टीम, क्वालिटी टीम, नर्सिंग आणि सिक्युरिटी सिस्टिमसह सर्व घटकांचे आभार मानण्यात आले आहेत
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !