पालकमंत्री आणि आमदार खताळ यांच्या पुढाकारातून महिलांना रोजगारासाठी बळ

संगमनेर Live
0
पालकमंत्री आणि आमदार खताळ यांच्या पुढाकारातून महिलांना रोजगारासाठी बळ

◻️ सावरगावतळ येथील बचत गटाला शंभर टक्के सबसिडीवर आधुनिक यंत्रसामग्री


​संगमनेर LIVE | ग्रामीण भागातील महिलांना केवळ गृहिणी न ठेवता त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून, संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथील ‘समृद्धी स्वयंसहायता समूह’ बचत गटाला अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या विशेष प्रयत्नांतून १०० टक्के अनुदानावर ही मदत देण्यात आली असून यामुळे ग्रामीण महिलांच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे.

​या उपक्रमांतर्गत बचत गटाला अन्नधान्य प्रक्रियेसाठी आवश्यक असणारे मल्टी पर्पज फूड ग्रेन ग्राईडर, उत्पादनांच्या व्यावसायिक पॅकिंगसाठी इम्पल्स सीलर व पोली पॅकिंग मशीन आणि उत्पादनाचे अचूक मोजमाप करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वजन काटा यांसारखी आधुनिक यंत्रसामग्री प्रदान करण्यात आली आहे. या सर्व साधनांमुळे महिलांना स्थानिक पातळीवरच हक्काचा रोजगार उपलब्ध होणार असून, अन्नधान्य प्रक्रिया आणि विक्रीचे काम अधिक सोयीस्कर व व्यावसायिक पद्धतीने करणे शक्य होईल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे उत्पादनाचा खर्च कमी होऊन महिलांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होणार आहे, ज्यामुळे खऱ्या अर्थाने महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी मदत होणार आहे.

​ग्रामीण महिलांच्या हाताला काम देऊन घरगुती उद्योगांना मोठी चालना देणारी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. सावरगाव तळ परिसरातील महिलांच्या सक्षमीकरणाला यामुळे मोठी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दरम्यान, मिळालेल्या या आधुनिक यंत्रसामग्रीमुळे समृद्धी बचत गटाच्या महिलांनी मोठा आनंद व्यक्त केला असून, स्वतःचा व्यवसाय व्यावसायिक स्तरावर नेण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ पाटील यांचे विशेष आभार मानले आहेत.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !