सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती महोत्सवनिमित्त १०१ रक्तदात्यांचे रक्तदान!

संगमनेर Live
0
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती महोत्सवनिमित्त १०१ रक्तदात्यांचे रक्तदान!

◻️ युवकांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा - बाळासाहेब थोरात


​संगमनेर LIVE | अमृत उद्योग समूहाचे संस्थापक, थोर स्वातंत्र्यसेनानी आणि सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून थोरात सहकारी साखर कारखान्यात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात कारखाना कर्मचारी, अधिकारी आणि कार्यकर्त्यानी मिळून एकूण १०१ जणांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.

​संगमनेर तालुक्यात १२ जानेवारी हा दिवस 'प्रेरणा दिन' म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि याच प्रेरणेतून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी एक विलक्षण आणि प्रेरणादायी योगायोग पाहायला मिळाला, तो म्हणजे कारखान्याचे सुरक्षा अधिकारी मोहनराव मस्के यांनी याच दिवशी आपल्या आयुष्यातील १०१ वे रक्तदान पूर्ण केले. या शिबिरासाठी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवला.

ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, “विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी अद्याप मानवी रक्ताला पर्याय निर्माण होऊ शकलेला नाही. वाढते अपघात आणि विविध आजारांमुळे रक्ताची मोठी गरज भासत आहे. एखाद्याचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी मोठ्या संख्येने रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा. हे जगातील सर्वश्रेष्ठ दान आहे." असे आवाहन केले.

​यावेळी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते १०१ वेळा रक्तदान करणाऱ्या मोहन मस्के यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

​कारखान्याचे व्हा. चेअरमन पांडुरंग घुले यांनी सांगितले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी दिलेला सामाजिक सेवेचा वारसा ‘अमृत' परिवारातील प्रत्येक कार्यकर्ता आणि कर्मचारी आजही तितक्याच निष्ठेने जपत आहे. अर्पण रक्तपेढीच्या सहकार्याने हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले आहे.

दरम्यान ​या कार्यक्रमाला कारखान्याचे संचालक नवनाथ आरगडे, विजय राहणे, मदन आंबरे, योगेश भालेराव, अरुण वाकचौरे, गुलाब देशमुख, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सेक्रेटरी किरण कानवडे, कार्यालयीन अधीक्षक कृष्णा दिघे, अनिल पाटोळे, तसेच अर्पण रक्तपेढीच्या सौ. प्रियांका वनवे व अन्य कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे ​प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी तर, आभार सेक्रेटरी किरण कानवडे यांनी मानले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !