बंद घर फोडून ७५ हजारांचे दागिने आणि रोकड लंपास

संगमनेर Live
0
बंद घर फोडून ७५ हजारांचे दागिने आणि रोकड लंपास

​◻️ चोरट्यांनी खिडकीचे गज वाकवून केला घरात प्रवेश; पोलिसांत गुन्हा दाखल


​संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून, एका बंद घराचे खिडकीचे गज तोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह ७५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसाकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दत्तात्रय कोल्हे (ज्येष्ठ नागरिक) हे सध्या ठाणे येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे कोल्हेवाडी येथे बंद घर आहे. मंगळवार, दिनांक १३ जानेवारी ते १८ जानेवारी या दरम्यानच्या काळात कोल्हेवाडी येथील घराभोवती असलेल्या तार कंम्पाऊंडची तार तोडून अज्ञात चोरट्यांनी आवारात प्रवेश केला. त्यानंतर घराच्या पूर्व बाजूच्या पोर्चमधील खिडकीचे लोखंडी गज तोडून आणि वाकवून चोरट्यांनी घरात प्रवेश मिळवला.

त्यानंतर चोरट्यांनी घरातील दक्षिण बाजूच्या बेडरूमच्या दरवाजाचा कडी-कोयडा तोडून आत प्रवेश केला. तेथील गोदरेज कपाटाचा दरवाजा उघडून त्यातील ॲल्युमिनियमच्या पेटीचे कुलूप तोडले. या पेटीत ठेवलेले सुमारे ६० हजार रुपये किमतीचे ३०-३० हजारांचे दोन सोन्याचे कॉइन्स, १० हजार रुपये किमतीची सोन्याची एक चैन आणि ५ हजार रुपयांची रोकड असा एकूण ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे.

फिर्यादी दत्तात्रय कोल्हे हे ठाणे येथे राहत असले तरी, डॉक्टरांची अपॉइंटमेंट असल्याने ते कोल्हेवाडी येथे आले होते. घरी पोहोचल्यानंतर त्यांना घराची तोडफोड आणि चोरी झाल्याचे लक्षात आले. सर्व वस्तूंची खातरजमा केल्यानंतर त्यांनी तातडीने पोलीसांत धाव घेतली.

याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. ३१/२०२६ नुसार बीएनएस कलम ३३१(४), ३३१(३), ३०५ प्रमाणे अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दरम्यान ​तालुक्यात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलीसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी कोल्हेवाडी ग्रामस्थांकडून होत आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !