इंदुरीकर महाराजांच्या अपघाताची अफवा; ती बातमी खोटी

संगमनेर Live
0
इंदुरीकर महाराजांच्या अपघाताची अफवा; ती बातमी खोटी

◻️​ महाराज पूर्णपणे सुरक्षित; अफवांवर विश्‍वास ठेवू नये 


संगमनेर LIVE | महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांचा अपघात झाल्याची धक्कादायक अफवा गेल्या काही तासांपासून सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरत आहे. मात्र, ही बातमी पूर्णपणे खोटी आणि निराधार असून, केवळ ‘टीआरपी’ आणि ‘व्ह्यूज’ मिळवण्यासाठी एका युट्यूब चॅनेलने हा खोडसाळपणा केल्याचे समोर आले आहे.

याबाबत माहिती अशी की, ​एका युट्यूब चॅनेलने इंदुरीकर महाराजांच्या अपघाताचे वृत्त प्रसिद्ध केले. ही बातमी व्हायरल होताच संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. महाराजांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्यासह निकटवर्तीयांना शेकडो फोन येत आहेत.

​महाराजांचे निकटवर्तीय किरण महाराज शेटे यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, “इंदुरीकर महाराज पूर्णपणे ठणठणीत असून त्यांची नियमित कीर्तन सेवा आणि सर्व दैनंदिन कामे व्यवस्थित सुरू आहेत. एका युटुंब चॅनेलने केवळ प्रसिद्धी आणि फायद्यासाठी ही अफवा पसरवली आहे.” असे सांगितले.

दरम्यान इंदुरीकर महाराजांच्या अपघाताची बातमी पूर्णतः खोटी असून महाराजांच्या समर्थकांनी आणि चाहत्यांनी अशा कोणत्याही चुकीच्या माहितीवर विश्‍वास ठेवू नये आणि चुकीची अफवा पुढे पसरवू नये, असे आवाहन देखील किरण महाराज शेटे यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !