अश्‍विनी पतसंस्थेकडून ‘पत्रकार दिना’निमित्त पत्रकारांचा गौरव

संगमनेर Live
0
अश्‍विनी पतसंस्थेकडून ‘पत्रकार दिना’निमित्त पत्रकारांचा गौरव

◻️ सामाजिक योगदानाबद्दल ‘लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा’ केला सन्मान


संगमनेर LIVE (आश्‍वी) | संगमनेर तालुक्यातील पंतसस्था क्षेत्रात आपल्या पारदर्शक कारभारामुळे नावलौकिक मिळवलेल्या अश्‍विनी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने ‘पत्रकार दिना’चे औचित्य साधून आश्‍वी खुर्द येथील शाखेत पंचक्रोशीतील पत्रकारांना त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल गौरविण्यात आले.

अश्‍विनी पतसंस्था ही केवळ एक वित्तीय संस्था नसून ती सर्व सामान्य नागरिक, शेतकरी, दूध उत्पादक, व्यावसायिक, व्यापारी आणि बागायतदार यांच्यासाठी आधारवड ठरली आहे. आर्थिक नियोजनातील शिस्त, ठेवीदारांशी असलेले आपुलकीचे संबंध आणि व्यवहारातील कमालीची पारदर्शकता यांमुळे या संस्थेने संपूर्ण तालुक्यात एक वेगळी विश्‍वासर्हता निर्माण केली आहे. यामुळेच या संस्थेचा उल्लेख पंचक्रोशीत ‘कामधेनू’ म्हणून केला जातो.

आश्‍वी खुर्द शाखेत नुकताच पत्रकार दिनानिमित्त दै. लोकमत चे पत्रकार योगेश रातडीया, दै. पुण्यनगरी चे पत्रकार संजय गायकवाड, दै. राष्ट्र सह्याद्री चे पत्रकार रवींद्र बालोटे, दै. पुढारी चे पत्रकार राजेश गायकवाड यांच्यासह दै. सार्वमत चे पत्रकार आणि संगमनेर लाईव्ह चे संपादक अनिल शेळके यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

​याप्रसंगी संस्थेचे चेअरमन मेजर संपतराव सांगळे, सरव्यवस्थापक बाळासाहेब डाहाळे, भारतराव गिते, रमेश जाधव, वीना देवळालकर, सुरेश आंधळे, कौतीक तांबे, स्वाती दातीर, मयुरेश शिंदे, अभय वाळेकर, अश्‍विनी तक्ते, श्री. ताजणे उपस्थित होते. दरम्यान ​संस्थेच्या या उपक्रमाबद्दल पत्रकारानी संस्थेचे आभार व्यक्त केले आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !