अहिल्यानगरमध्ये ५ हजार विद्यार्थ्याचे शिस्तबद्ध संचलन!

संगमनेर Live
0
अहिल्यानगरमध्ये ५ हजार विद्यार्थ्याचे शिस्तबद्ध संचलन!

◻️ ‘राष्ट्रप्रथम' उपक्रमाला पालकमंत्री विखे पाटील यांची दाद

संगमनेर LIVE ​(अहिल्यानगर) | प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘राष्ट्रप्रथम' उपक्रमांतर्गत अहिल्यानगरमधील पोलीस परेड मैदानावर अभूतपूर्व सोहळा पार पडला. शहरातील २५ शाळांमधील सुमारे पाच हजार विद्यार्थ्यानी यावेळी शिस्तबद्ध संचलन व देशभक्तीपर गीतांवर ताल धरला. विद्यार्थ्यांची ही शिस्त आणि उत्साह पाहून उपस्थित नागरिक व मान्यवर भारावून गेले.
पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी या सोहळ्याला विशेष उपस्थिती लावली. हजारो विद्यार्थ्याची एकाच लयीतील हालचाल पाहून त्यांनी मैदानात जाऊन विद्यार्थ्याचे व शिक्षकांचे कौतुक केले. मुलांचा उत्साह पाहून त्यांनाही फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.
शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली केवळ शहरातच नाही, तर जिल्हाभरात हजारो शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला.
​यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. 

दरम्यान हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षण विभागातील अधिकारी व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !