कॉग्रेसच्या ‘युवा शक्ती’चा आमदार खताळ यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

संगमनेर Live
0
कॉग्रेसच्या ‘युवा शक्ती’चा आमदार खताळ यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

◻️​ चंदनापुरी येथील तरुणांनी भगवा हाती घेत विकासाचा केला निर्धार


​संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, चंदनापुरी गावातील अनेक कॉग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यानी आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. या मोठ्या राजकीय घडामोडीमुळे चंदनापुरी परिसरात शिवसेनेला मोठे बळ मिळाले असून तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

​आमदार खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य श्याम रहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेश पार पडला.

याप्रसंगी ​हरिभाऊ सोन्याबापू रहाणे, सोपान निवृत्ती दुधवडे, पांडुरंग अण्णा काळे, रामदास काशिनाथ दुधवडे, खंडू अण्णा काळे, रवींद्र निवृत्ती काळे, रवींद्र सुनील मेंगाळ, नवनाथ रामनाथ दुधवडे, सागर पुंजा दुधवडे, दीपक बाळू दुधवडे, सचिन जनाभाऊ काळे, राहुल आनंदा मधे, विनीत निवृत्ती दुधवडे, सुनील सुभाष काळे, बाळासाहेब गंगाराम काळे, भाऊसाहेब पुंजा काळे, प्रीतम दिलीप दुधवडे, विठ्ठल सीताराम दुधवडे, अजय हरिभाऊ केदार, विकास शिवाजी दुधवडे, लक्ष्मण नाना दुधवडे, निलेश अशोक मधे, सचिन नाथा दुधवडे, अनिल वाळीबा फोडसे यांसह अनेक तरुणांनी कॉग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचा भगवा हाती घेतला.

​यावेळी आमदार अमोल खताळ यांनी सर्व नूतन सदस्यांचे स्वागत करून त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, ​“शिवसेना हा सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सातत्याने काम करणारा, लोकाभिमुख आणि लढवय्या पक्ष आहे. समाजातील प्रत्येक घटकाचा विकास हाच शिवसेनेचा केंद्रबिंदू असून, तरुणांच्या सक्रिय सहभागामुळे संघटना अधिक सक्षम, मजबूत आणि गतिमान होईल. चंदनापुरीसह संपूर्ण संगमनेर तालुक्याच्या सर्वागीण विकासासाठी, मूलभूत सुविधा, रोजगार, शिक्षण आणि पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध राहील.” अशी ग्वाही दिली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !