‘मातोश्री प्रतिष्ठान चषक’ फुटबॉल स्पर्धेत प्रवरा पब्लिक स्कूल अजिंक्य

संगमनेर Live
0
‘मातोश्री प्रतिष्ठान चषक’ फुटबॉल स्पर्धेत प्रवरा पब्लिक स्कूल अजिंक्य

◻️उत्कृष्ट संघभावना आणि जिद्दीच्या जोरावर प्रवरेच्या खेळाडूंनी मिळवले दैदिप्यमान यश
 


संगमनेर LIVE (​लोणी) | लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यानी आपल्या क्रीडा कौशल्याच्या जोरावर फुटबॉल मैदानात घवघवीत यश संपादन केले आहे. सावेडी (अहिल्यानगर) येथे आयोजित करण्यात आलेल्या १३ वर्षाखालील ‘मातोश्री प्रतिष्ठान चषक’ (डे-नाईट) फुटबॉल स्पर्धेत या विद्यार्थ्यानी अजिंक्यपद पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

​या स्पर्धेत प्रवरा पब्लिक स्कूलच्या ११ विद्यार्थ्यानी फिरोदिया शिवाजीयन्स फुटबॉल अकॅडमीचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट खेळाडूवृत्तीचे दर्शन घडवले. संपूर्ण स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी उत्तम संघभावना, कौशल्य आणि जिद्द दाखवली असून त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे संघाने स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. 

या विजयात वैयक्तिक कामगिरीचाही मोठा वाटा राहिला, ज्यामध्ये जयवर्धन माने देशमुख याने उपांत्यपूर्व सामन्यात ‘सामनावीर’ पुरस्कार पटकावला, तर ओमकार कामडी याला स्पर्धेतील ‘सर्वोत्तम गोलरक्षक’ आणि जतिन गायकवाड याला ‘सर्वोत्तम स्ट्रायकर’ म्हणून गौरवण्यात आले. या विजयी मोहिमेचे नेतृत्व कर्णधार युवराज आहेर आणि उपकर्णधार कल्पेश भोये यांनी अत्यंत कुशलतेने केले.

​विद्यार्थ्याच्या या यशामागे शाळेचे प्राचार्य डॉ. बी. बी. अंबाडे, उपप्राचार्य के. टी. अडसूळ, पर्यवेक्षिका सौ. एम. एस. जगधने, सौ. शुभांगी रत्नपारखी, फुटबॉल प्रशिक्षक अतुल डे, शारीरिक शिक्षण संचालक आर. बी. दळे आणि दीपक जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिक्षकांच्या या मार्गदर्शनामुळेच विद्यार्थ्यांनी तांत्रिक आणि शारीरिक दृष्ट्या सज्ज होऊन हे यश मिळवले.

​यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील आणि माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांनी विशेष अभिनंदन केले. तसेच संस्थेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे, अतांत्रिक संचालक डॉ. प्रदीप दिघे आणि शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे यांनीही खेळाडूंचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

​“आमच्या विद्यार्थ्यानी मैदानावर दाखवलेली शिस्त आणि कौशल्य अभिमानास्पद आहे. क्रीडा क्षेत्रात अशाच प्रकारे प्रवराचा नावलौकिक वाढत राहील हा आम्हाला विश्वास आहे.” असा विश्वास प्रवरा पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ. बी. बी. अंबाडे यांनी व्यक्त केला.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !