राहाता महाविद्यालयात दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

संगमनेर Live
0
राहाता महाविद्यालयात दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन 

◻️ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार उद्घाटन

◻️ ​देश - विदेशातील नामवंत तज्ज्ञ राहणार उपस्थिती


संगमनेर LIVE (​राहाता) | शिर्डी साई रुरल इन्स्टिट्यूट संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, राहाता येथे शैक्षणिक क्षेत्रातील एक मैलाचा दगड ठरणारी दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद शुक्रवार दि. १६ आणि शनिवार दि. १७ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. 

या परिषदेचा मुख्य विषय ‘भाषा, साहित्य आणि वाणिज्य : उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये सांस्कृतिक कथन आणि व्यावसायिक पद्धतींचा अभ्यास’ असा असून, याचे उद्घाटन शुक्रवार दि. १६ जानेवारी रोजी सकाळी १०:०० वाजता राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. 

संस्थेच्या संचालिका सौ. धनश्रीताई विखे पाटील आणि कॅम्पस डायरेक्टर प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम आंतरविद्याशाखीय स्वरूपाचा असून, यामध्ये जागतिक स्तरावरील विविध विषयातील संशोधक आणि तज्ज्ञ सहभागी होणार असल्याची माहिती समन्वयक डॉ. सत्यजित पोतदार यांनी दिली आहे.

​महाविद्यालयातील इंग्रजी, मराठी, हिंदी व वाणिज्य विभाग तसेच भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आंतरीच गुणवत्ता सुधार कक्ष च्या सहकार्याने या परिषदेचे नियोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये भाषा, साहित्य, संवाद, सांस्कृतिक अभ्यास, तसेच जागतिक व भारतीय अर्थव्यवस्थेतील बदलत्या प्रवाहावर सखोल चर्चा होणार आहे. 

विशेष म्हणजे या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी देश-विदेशातील नामवंत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार असून, त्यामध्ये क्रिस्तीना रोजेटी (बेल्जियम/जर्मनी), प्रो. बिदम आबा (मॉरिशियस), प्रा. लक्ष्मण प्रसाद भंडारी व प्रा. डॉ. बिनोद कुमार विश्वकर्मा (नेपाळ), प्रो. अयेकपाम इबेमचा चानु (आसाम), प्रा. एन. एस. गुंडूर (कर्नाटक), डॉ. मनीषा नेसरकर (बेळगाव), डॉ. साजिद शशी (केरळ), डॉ. संदीप सांगळे, प्रा. प्रांतिक बॅनर्जी, प्रा. डॉ. आनंद कुलकर्णी, प्रा. डॉ. रवींद्र तासीलदार, प्रा. मनोहर सानप, प्रो. डॉ. सदानंद भोसले आणि डॉ. शाकीर शेख यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे.

​या परिषदेमुळे नव्या संशोधन दृष्टिकोनांना चालना मिळेल आणि युवा संशोधकांना संशोधनासाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळेल, असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोमनाथ घोलप यांनी व्यक्त केले आहे. परिषदेमध्ये सादर होणाऱ्या निवडक शोधनिबंधांना नामांकित ‘रेफर्ड' व 'रिपोर्टेड' जर्नलमध्ये प्रकाशित करण्याची संधीही दिली जाणार आहे. 

या भव्य उपक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. रोहिणी कासार (इंग्रजी विभाग) काम पाहत असून सह-समन्वयक म्हणून डॉ. ऐनूर शेख (हिंदी विभाग), डॉ. संजय कदम (मराठी विभाग) व डॉ. राजाराम वाकचौरे (वाणिज्य विभाग) सहकार्य करत आहेत. संस्थेच्या संचालिका सौ. धनश्रीताई विखे पाटील यांनी सर्व अभ्यासक, संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी या महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !