शिर्डीला ‘अध्यात्मिक कॉरिडॉर’ म्हणून विकसित करणार - नामदार विखे पाटील
◻️ शिर्डी उपनगराध्यक्षपदी अभय शेळके; विखे पाटलांकडून विकासाचा ‘रोडमॅप' जाहीर
संगमनेर LIVE (शिर्डी) | नगरपालिका निवडणुकीत शहराच्या जनतेने अतिशय विश्वासाने भाजप आणि महायुतीवर दाखवलेला विश्वास विकास कामाच्या माध्यमातून सार्थ ठरविणार असून, कुंभमेळ्याच्या निमिताने विकास प्रक्रीयेत नगरपरीषद महत्वपूर्ण भूमिका बजावेल असा विश्वास जलसंपदा तथा पालक मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
शिर्डी नगरपरीषदेच्या उपनगराध्यक्ष पदाची निवडणुक प्रक्रीया संपन्न झाली.सर्वानूमते अभय शेळके यांची उपनगराध्यक्ष पदावर निवड करण्यात आली. धनराज कैलास कोते, अब्रार कैयुम शेख यांची स्विकृत नगरसेवक म्हणून निवड घोषित करण्यात आली. नविन पदाधिकाऱ्यांचे मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सत्कार करून अभिनंदन केले. नगराध्यक्षा सौ. जयश्री थोरात, सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, भाजपाचे जेष्ठ नेते राजेंद्र गोंदकर, भाजपाचे शहर अध्यक्ष रविंद्र गोंदकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, शिर्डीच्या जनतेने भाजप आणि महायुतीला ऐतिहासिक असे बहमुत देवून मोठे पाठबळ दिले आहे. यापुर्वी शिर्डी शहरामध्ये निरंतरपणे सुरू असलेल्या विकास प्रक्रीयेला जनतेन नेहमीच साथ दिली आहे. यंदाच्या निवडणुकीत विकास कामांच्या मागे विश्वासाने उभी राहीली. येणाऱ्या काळात शहराच्या विकासाच्या दृष्टीने सर्व नविन पदाधिकारी काम करतील.
नगरपरीषदेच्या निवडणुकीत मिळालेला ऐतिहासिक विजय जबाबदारीची जाणीव करून देणारा असल्याचे स्पष्ट करून विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या निर्णयांचे असल्याचे
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहर विकासाला अधिक गती द्यावी लागणार आहे. कुंभमेळ्यासाठी येणारे भाविक शिर्डी मध्ये मोठ्या संख्येने येतील त्यादृष्टीने आतापासून तयारी सुरू करावी लागेल. यासर्व विकास प्रक्रीयेत नगरपरीषदेची भूमिका महत्वपूर्ण ठरेल. शिर्डी शहर अध्यात्मिक काॅरीडाॅर म्हणून विकसित करण्याचे नियोजन सुरू केले असून त्यावरच भविष्यात काम करायचे असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.