पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार शपथ घेणार!

संगमनेर Live
0
पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार शपथ घेणार!

◻️​ अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीची धुरा सुनेत्रा वहिनींच्या खांद्यावर


संगमनेर LIVE (​मुंबई) | राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तर्कवितर्काना आता पूर्णविराम मिळाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आता राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळणार आहेत. आज शनिवारी सायंकाळी पाच वाजता त्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार असून, या निर्णयामुळे राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये एक नवा उत्साह पाहायला मिळत आहे.

​अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात होती. या संकटकाळात पक्षाला सावरण्यासाठी आणि कार्यकर्त्याचे मनोबल उंचावण्यासाठी सुनेत्रा पवार यांनीच उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावे, असा आग्रह पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून धरला जात होता. सुरुवातीला या भूमिकेसाठी संभ्रम असला तरी, अजित पवारांचे निकटवर्तीय नरेश अरोरा आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या सखोल चर्चेनंतर सुनेत्रा पवार यांनी ही महत्त्वाची जबाबदारी स्वीकारण्यास संमती दर्शवली आहे. तत्पूर्वी, आज राष्ट्रवादीच्या विधीमंडळ गटनेतेपदी त्यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे.

​अजित पवार यांच्याकडे राज्याचे अर्थखातं, क्रीडा आणि राज्य उत्पादन शुल्क यांसारखी अत्यंत महत्त्वाची खाती होती. आता सुनेत्रा पवार यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशानंतर ही खाती त्यांच्याकडेच सोपवली जाणार की त्यात काही फेरबदल होणार, याबाबत सध्या राजकीय वर्तुळात खलबतं सुरू आहेत. दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या शपथविधी सोहळ्याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे. शरद पवारांच्या या गुढ विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आले असून, या शपथविधीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान ​राजभवनावर या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात असून, सुनेत्रा पवार यांच्या रूपाने राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !