आश्वी येथे बाळासाहेब ठाकरे यांना १०० व्या जयंतीनिमित्त अभिवादन!
◻️ ‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि ‘बाळासाहेब ठाकरे अमर रहे’ घोषणांनी परिसर दुमदुमला
संगमनेर LIVE (आश्वी) | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि ‘बाळासाहेब ठाकरे अमर रहे’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि त्यांनी दिलेली शिकवण आजही शिवसैनिकांमध्ये ऊर्जा निर्माण करते, असे मत यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी व्यक्त करत शिवसेनाप्रमुखाच्या आठवणींना उजाळा दिला.
याप्रसंगी शिवसेनेचे (उबाठा) उप तालुकाप्रमुख कैलास बिहाणी, गण आणि शाखाप्रमुख बाबासाहेब शिंदे, सरपंच नामदेव शिंदे, उपसरपंच बाळासाहेब मदने, चंद्रकांत शिंदे, सुभाष गाडेकर, प्रकाश गायकवाड, लियाकत शेख, बबन शिंदे, अण्णासाहेब जाधव, अझहर शेख, अस्लम शेख, पापाभाई शेख, अशोक राखपसरे, बबलू सारबंदे, संतोष ताजणे यांच्यासह शिवसैनिक आणि सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.