मांचीहिल येथील ‘ज्ञानगंगा विद्यानिकेतन’ची चित्रकला परीक्षेत सुवर्णभरारी!
◻️ शिक्षिका प्रिया शिंदे यांच्या मार्गदर्शनााखाली १३३ विद्यार्थी उत्तीर्ण
संगमनेर LIVE | महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षेत संगमनेर तालुक्यातील मांचीहिल येथील ‘ज्ञानगंगा विद्यानिकेतन’ शाळेने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या परीक्षेत शाळेतील एकूण १३३ विद्यार्थ्यानी घवघवीत यश संपादित केले आहे.
विषय शिक्षिका प्रिया शिंदे यांनी यंदाच्या परिक्षेसाठी अतिशय नियोजनबद्ध तयारी करून घेतली होती, ज्याचे फलित निकालातून स्पष्ट झाले आहे. यामध्ये एलिमेंटरी स्तरावर ८७ विद्यार्थ्यानी यश मिळवले असून, इंटरमिजिएट स्तरावरील परीक्षेत ४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अशा प्रकारे एकूण १३३ विद्यार्थ्यानी या दोन्ही स्तरांवर दैदिप्यमान कामगिरी करत शाळेचा नावलौकिक वाढवला आहे.
विद्यार्थ्याच्या या यशामागे विषय शिक्षिका प्रिया शिंदे आणि विद्यानिकेतनच्या अन्य शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांनी विद्यार्थ्याकडून चित्रकलेचे विविध पैलू, रंगसंगती आणि तांत्रिक बाबींचा सखोल सराव करून घेतल्यामुळेच हे यश शक्य झाले.
दरम्यान या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अॅड. शाळीग्राम होडगर, विश्वस्त डॉ. शैलेंद्रसिंह होडगर, डॉ. दिग्विजय होडगर, नीलिमा गुणे, प्राचार्य विजय पिसे, उपाध्यक्ष अण्णासाहेब बलमे, जनरल मॅनेजर किसन हजारे, उपप्राचार्य गंगाधर चिंधे, मुख्याध्यापिका योगिता दुकळे, सुनिल आढाव तसेच सर्व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यासह मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.