देवगड खंडोबा अश्व प्रदर्शनासाठी भरीव निधी - आमदार अमोल खताळ
◻️ अश्वसेवा संस्थेकडून अश्व आणि पशु-पक्षी पालकांचा गौरव
संगमनेर LIVE | देवगड खंडोबा यात्रा उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अश्व आणि पशु-पक्षी प्रदर्शनासाठी जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीमध्ये भरीव निधी वाढविण्याबाबत जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या. त्या सूचनांनुसार या प्रदर्शनासाठी जिल्हा नियोजनमधून भरीव स्वरूपाचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.
संगमनेर तालुक्यातील देवगड खंडोबा यात्रा उत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही देवगड अश्वसेवा संस्थेच्यावतीने अश्व आणि पशु-पक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन आणि बक्षीस वितरण आमदार खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
यावेळी महंत एकनाथ महाराज, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त उमेश पाटील, सहायक आयुक्त दशरथ दिघे, सहायक आयुक्त भाऊसाहेब डौले, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, संगमनेर पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. पुंडलिक येवले, अकोले पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. अतुल पाटणे, भाजपचे माजी अध्यक्ष काशिनाथ पावसे, देवगड अश्वसेवा संस्थेचे अध्यक्ष उत्तम जाधव, सरपंच सुभाष गडाख, उपसरपंच सुजाता दवंगे, ग्रामपंचायत अधिकारी हरीश गडाख, पोलीस पाटील मथाजी पावसे, शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी, सरचिटणीस गणेश दवंगे, केशव दवंगे, सोमनाथ भालेराव, चंद्रशेखर गडाख, सोमनाथ दवंगे, भारत गोफणे, कैलास दिवटे, किरण पावसे, मोठ्याभाऊ बडे, सोमनाथ पावसे, बाबासाहेब पावसे, सचिन सस्कर, अण्णासाहेब काळे आदी उपस्थित होते.
आमदार खताळ पुढे म्हणाले, श्री क्षेत्र देवगड येथे खंडोबा महाराजांच्या यात्रोत्सवानिमित भरविण्यात येणाऱ्या अश्व प्रदर्शनासाठी निधी अपुरा पडत असल्याने त्यामध्ये वाढ करावी, अशी मागणी अश्वसेवा संस्थेचे अध्यक्ष उत्तम जाधव, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे, सरचिटणीस गणेश दवंगे, केशव दवंगे व सोमनाथ भालेराव यांनी माझ्याकडे केली होती. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडे निधी वाढविण्याची मागणी करण्यात आली. ही मागणी तत्काळ मान्य करण्यात आल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले.
देवगड पंचक्रोशी परिसरात आतापर्यंत सुमारे ८ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. माझे कुलदैवत खंडोबा महाराज यांच्या आशीर्वादाने आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नांमुळे देवगड देवस्थानाला ‘ब’ वर्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे सुमारे ५ कोटी रुपयांचा निधी मिळणार असून, त्या निधीतून मंदिर परिसराचा सर्वागीण विकास केला जाणार असल्याचा विशेष आनंद त्यांनी व्यक्त केला. यासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व पालकमंत्री विखे पाटील यांनी मोलाचे सहकार्य केल्याचेही आमदार अमोल खताळ यांनी नमूद केले.
“मी कट्टर हिंदू आहे आणि हिंदुत्वाचा मला अभिमान आहे. मात्र देवस्थानात राजकारण करणाऱ्यांना योग्य उत्तर खंडोबा महाराजच देतील. शांतता, सलोखा आणि विकास हाच आपला अजेंडा आहे. जनतेसाठी गरज पडल्यास आमदारकी पणाला लावीन, मात्र मायबाप जनतेच्या पाठीशी ठामपणे उभा राहीन.” अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली.
यावेळी अश्वप्रदर्शन नाचकाम स्पर्धेत प्रथम क्रमांक नामदेव साबळे, बाळासाहेब वाघ, विकी वारंघुसे, सागर जाधव, रणजीत खोमणे, रमेश पवार, निलेश तिवारी तसेच उत्कृष्ट घोडा किरण पवार, मनोज कुटे, ईश्वर गटकळ, आदम घोडा स्पर्धेत आदित्य गायकवाड, ओमकार सांगळे, आयुष गुंजाळ, उत्कृष्ट आदण घोडी स्पर्धेत अभिजीत खोसे, मुझमीन शेख, फैजान शेख व रेवाल चाल स्पर्धेत मोहीम खान, मुजबिल शेख, अश्पाक शेख आदींनी या स्पर्धेत आमदार खताळ यांच्या हस्ते सन्मान पत्र व सन्मानचिन्ह बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
पशु-पक्षी प्रदर्शन स्पर्धेत अर्जुन गायकवाड, रोशन सारूक्ते, गणेश मांडे, बळवंत पानसरे, रवींद्र आल्हाट, रघुनाथ धुमाळ, भाऊसाहेब तुपे, सुदाम आंबेकर, सचिन घोडसरे, भागवत कासार, दत्तू कोकणे, ऋषिकेश कानवडे, बिरदेव सोन्नर, प्रसाद कंगनकर, प्रशांत वाणी, जगदीश सोन्नर याचा देखील आमदार खताळ यांच्या हस्ते सन्मानपत्र व सन्मानचिन्ह बक्षीस देऊन गौरव करण्यात आला आहे.