वरवंडीच्या सौर प्रकल्पामुळे आश्‍वी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार

संगमनेर Live
0
वरवंडीच्या सौर प्रकल्पामुळे आश्‍वी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार

◻️ मंत्री विखे पाटील​ यांच्याकडून ‘कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारणार असल्याची माहिती
 


संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील वरवंडी येथील सौर उर्जा प्रकल्पामुळे आश्‍वी आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असून, शिबलापूर येथील वीज उपकेंद्रामुळे भारनियमाच्या समस्येतून गावांची मुक्तता होणार असल्याची माहीती जलसंपदा तथा पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

मंत्री विखे पाटील यांनी आश्‍वी खुर्द, दाढ खर्द आणि झरेकाठी या गावातील ग्रामस्थांच्या भेटी घेवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. रस्ते स्थानिक अतिक्रमण पाणी आणि वीजेच्या प्रश्नावर शेतकऱ्यांनी मांडलेल्या समस्यांवर त्यांनी प्रशासनाकडून सुरू असलेल्या कार्यवाहीची माहीती दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने सौर उर्जेचे धोरण घेवून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होत असल्याने अनेक गावांना दिवसा वीज उपलब्ध होत आहे. 

वरवंडी येथील सुमारे २० केव्ही क्षमतेचा सौर उर्जा प्रकल्पाचे काम महीन्याभरात पूर्ण होणार असून या प्रकल्पातून दाढ खर्द, चणेगाव, आश्‍वी खुर्द, शिबलापूर, पानोडी, आश्‍वी बुद्रूक, उंबरी, शेडगाव, हंगेवाडी या गावांनाही या प्रकल्पाचा लाभ होईल. शिबलापूर येथील ५ केव्ही क्षमतेचे उपकेंद्र असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

जलसंपदा विभागाच्या माध्यमातून कालव्यांवर झालेले अतिक्रमण पूर्णपणे काढण्यात येणार आहेत. यासाठी सर्वानी सहकार्य करण्याचे आवाहन करून कालवे, चाऱ्या अतिक्रमण मुक्त झाले तरच पाण्याची वहन क्षमता वाढणार आहे. प्रवरा डाव्या व उजव्या कालव्याच्या नूतनीकरणासाठी जलसंपदा विभागाने १५० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. निळवंडेच्या पाण्याचा लाभ वंचित गावांना कसा करून देता येईल याबाबत त्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना माहीती सादर करण्याच्या सूचना दिल्या.

केंद्र सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पाचा उल्लेख करून मंत्री विखे पाटील म्हणाले की, पहिल्यांदा देशातील युवकांना केंद्रस्थानी ठेवून अर्थसंकल्प सादर झाला. यामध्ये उद्योग आणि युवकांच्या रोजगाराला प्राधान्य देण्यात आले आहे. मागील अनेक वर्षांपासून आपल्या मतदारसंघात कौशल्य विकासावर काम सुरू आहे.

शिर्डी औद्यगिक वसाहती मध्ये निबे उद्योग समूहाने सुरू केलेल्या प्रकल्पामध्ये आयटीआय झालेल्या युवकांना नौकरीच्या संधी मिळाल्या. अजूनही प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज असल्याचे सांगून आश्‍वी भागातच कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याबाबत निर्णय करणार असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

आश्‍वी आणि परीसरातील गावांच्या रस्ते विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. परंतू अतिक्रमणामुळे काम रखडली जातात. गटारींच्या  कामाबाबत  स्थानिक पातळीवर तातडीने निर्णय करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाला सर्व अत्याधुनिक सामुग्री करीता ९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. याची अधिकाऱ्यांना मदत झाली थर्मल ड्रोन कॅमेरामुळे मोठ्या प्रमाणात बिबटे जेरबंद करण्यात यश आल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !