वडगावपानच्या ५०० महिला १० एसी बसेसमधून ‘अभ्यास दौऱ्या’साठी रवाना!

संगमनेर Live
0
वडगावपानच्या ५०० महिला १० एसी बसेसमधून ‘अभ्यास दौऱ्या’साठी रवाना!

◻️ ​आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते दौऱ्याचा शुभारंभ


​संगमनेर LIVE | मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत संगमनेर तालुक्यातील वडगावपान ग्रामपंचायतीने महिला सक्षमीकरणासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली गावातील सुमारे ५०० महिला १० वातानुकूलित बसेसमधून अभ्यास दौरा आणि तीर्थयात्रेसाठी उत्साहात रवाना झाल्या आहेत. 

वडगावपानचे ग्रामदैवत श्री कानिफनाथ महाराज यांना आमदार अमोल खताळ आणि सरपंच श्रीनाथ थोरात यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करून या दौऱ्याचा प्रारंभ करण्यात आला.

​केवळ देवदर्शनच नव्हे, तर ‘शिकण्यासाठी प्रवास' हे या दौऱ्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. या दौऱ्याच्या अंतर्गत सहभागी महिला पंढरपूरजवळील राज्यस्तरीय ‘आदर्श ग्रामपंचायत' असलेल्या गोपाळपूर ग्रामपंचायतीस भेट देऊन तेथील कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. ग्रामपंचायतीचा कारभार कसा चालतो, विकासकामे कशी राबविली जातात आणि प्रशासकीय कामकाजात महिलांचा सहभाग कसा वाढवता येईल, याचे महत्त्वपूर्ण धडे या महिलांना प्रत्यक्ष भेटीतून मिळणार आहेत. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा अभ्यास दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

​या अभ्यास दौऱ्यासोबतच महिलांना महाराष्ट्रातील प्रमुख पावन तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. यामध्ये संत सावता महाराज यांची समाधी असलेल्या श्रीक्षेत्र अरणसह पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज आणि तुळजापूरची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी माता या पवित्र स्थानांचा समावेश आहे. भक्ती आणि ज्ञानाचा हा संगम महिलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी प्रेरक ठरणार आहे.

​या उपक्रमाबाबत बोलताना आमदार अमोल खताळ म्हणाले की, “मुख्यमंत्री पंचायत राज अभियानांतर्गत महिलांना अशा प्रकारे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. वडगावपान ग्रामपंचायतीने मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी हा पायंडा सुरू ठेवला असून, या अभ्यास दौऱ्यामुळे महिलांचा आत्मविश्वास निश्चितच वाढेल.” असा विश्वास व्यक्त केला.

दरम्यान या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सरपंच श्रीनाथ थोरात, उपसरपंच सोमनाथ गायकवाड, ग्रामपंचायत अधिकारी संजय कांहडळ, तसेच ग्रामपंचायत सदस्य सुमित काशीद, छाया काशीद, सुरेखा थोरात, सोनाली गडगे आणि सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !