मुळाथडी परिसराचे माझ्या जडणघडणीत मोठे योगदान - खासदार वाकचौरे

संगमनेर Live
0
मुळाथडी परिसराचे माझ्या जडणघडणीत मोठे योगदान - खासदार वाकचौरे

◻️ पानेगाव येथील विविध विकासकामांसाठी निधी कमी न पडू देण्याची दिली ग्वाही!

संगमनेर LIVE (​पानेगाव) | “नेवासे आणि राहुरी तालुक्यातील मुळाथडी परिसरातील गावांचे माझ्या सामाजिक आणि राजकीय कार्यात मोठे योगदान आहे. गटविकास अधिकारी पदापासून ते संसदेपर्यंत पोहोचवण्यात या भागातील जनतेचा मोलाचा वाटा असून, या परिसराच्या विकासासाठी मी निधीची कमतरता भासू देणार नाही,” अशी ग्वाही शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिली.

पानेगाव (ता. नेवासे) येथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आयोजित ६० व्या अखंड हरिनाम सप्ताहादरम्यान ग्रामस्थांशी संवाद साधताना खासदार वाकचौरे बोलत होते.

​कार्यक्रमात बोलताना खासदार वाकचौरे यांनी आपल्या प्रशासकीय आणि राजकीय प्रवासातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी स्पष्ट केले की, ‘आपला माणूस आपल्यासाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन मी सातत्याने जनतेचा सेवक म्हणून कार्य करत राहीन. यावेळी त्यांनी पानेगाव - चिमटा मार्ग सोनई रस्ता आणि गाव अंतर्गत सुशोभीकरण यांसारख्या महत्त्वपूर्ण विकासकामांसाठी तात्काळ निधी देण्याची घोषणा केली. या घोषणांचे ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त स्वागत केले.

​सोनई-करजगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष संजय जंगले यांनी खासदारांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपल्या कामातून खासदार निधीचा योग्य विनियोग कसा करावा, हे आदर्शवत पद्धतीने दाखवून दिले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा कायापालट झाला असून, साईबाबांच्या आशीर्वादाने ते लवकरच केंद्रात मंत्री म्हणून दिसतील, असा ठाम विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

​या सोहळ्याला शिवसेना (ठाकरे गट) उपजिल्हाप्रमुख अनिल बांगर, शिवसेना नेवासा तालुका उपप्रमुख मुन्ना चक्रनारायण, राहुरी तालुका शिवसेना उप तालुकाप्रमुख रावसाहेब भगत, दादासाहेब होन, सुभाष पवार, पानेगावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. निकीता भोसले-आंबेकर, उप सरपंच सुरेश जंगले, किशोर जंगले, जयवंत गुडधे, मुळाचे संचालक रंगनाथ जंगले, पानेगाव संस्थेचे जेष्ठ संचालक राजेंद्र जंगले, बाबासाहेब चिंधे, ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब नवगिरे, सुरज जंगले, अमित जंगले, संकेत गुडधे, भाऊसाहेब काकडे, द्वारकानाथ चिंधे, नानासाहेब जंगले, पानेगावचे माजी सरपंच हौशाबापू जंगले, तंटामुक्ती अध्यक्ष उध्दव चिंधे, उपाध्यक्ष सुरेंद्र जंगले आणि ग्रामविकास अधिकारी गणेश पाखरे आदी उपस्थित होते.

दरम्यान, ​कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुळाचे संचालक संजय जंगले यांनी केले, तर सूत्रसंचालन सुभाष गुडधे यांनी आणि उपस्थितांचे आभार संदिप जंगले यांनी मानले. अत्यंत उत्साही आणि भक्तिमय वातावरणात हा सोहळा संपन्न झाला. अशी माहिती पत्रकार बाळासाहेब नवगिरे यांनी कळवली आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !