सात्रळच्या ‘अल्फा क्लास’च्या विद्यार्थ्याचे राष्ट्रीय ‘रंगोत्सव’ परीक्षेत सुयश!

संगमनेर Live
0
सात्रळच्या ‘अल्फा क्लास’च्या विद्यार्थ्याचे राष्ट्रीय ‘रंगोत्सव’ परीक्षेत सुयश!

◻️ २१ हून अधिक विद्यार्थ्याची राष्ट्रीय शिष्यवृत्तीकडे वाटचाल, चित्रकला-हस्ताक्षरातही उमटविला ठसा


संगमनेर LIVE (​सात्रळ) | गुणवत्तेचा सातत्यपूर्ण आलेख राखत राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील ‘अल्फा क्लास’ च्या विद्यार्थ्यानी नुकत्याच जाहीर झालेल्या ‘रंगोत्सव’ या राष्ट्रीय स्तरावरील चित्रकला व हस्ताक्षर स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवले आहे.

​या स्पर्धा परीक्षेत तुषार शिंदे व समृद्धी प्रधान यांनी ११० गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले आहे. त्यांच्यासोबतच सोहंम शिंगोटे (१०८ गुण), गौरी सांगळे (१०७ गुण), प्रसाद गिते (१०३ गुण), प्रांजल ब्राह्मणे (१०२ गुण) आणि चेतन शिंदे (१०१ गुण) या सात विद्यार्थ्यानी १०० हून अधिक गुणांचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. 

याचबरोबर ओमकार हिरगळ, श्रेयस म्हैसकर, नैतिक जोर्वेकर, साईशा दिघे, हरिओम लोंढे, प्रणित सिनारे, निखिल डुक्रे, अंकिता विधाते, चैतन्य खेमनर, कांचन घोडके, साई साबळे, सुजल नाईकवाडे, स्वयम रोकडे आणि सोहंम बलमे या विद्यार्थ्यानीही अत्यंत चुरशीच्या या परीक्षेत उत्तम गुण संपादन करून यशाचे शिखर गाठले आहे.

दरम्यान ​विद्यार्थ्याच्या या यशाबद्दल क्लासचे संचालक प्रा. स्वप्नील कडू यांनी सर्व गुणवंतांचे अभिनंदन केले आहे. या सर्व विद्यार्थ्याना प्रा. संदीप शिंदे, प्रा. विजय सिनारे, प्रा. रेखा प्रधान, प्रा. तृप्ती कडू, प्रा. महेश घोलप आणि प्रा. शुभम चौधरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशामुळे सात्रळ परिसरातून विद्यार्थ्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पालकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे. अशी माहिती पत्रकार समर्थ वाकचौरे यांनी कळवली आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !