आमदार अमोल खताळ यांची कानिफनाथ महाराज यात्रोत्सवात ‘लाडूतुला’

संगमनेर Live
0
आमदार अमोल खताळ यांची कानिफनाथ महाराज यात्रोत्सवात ‘लाडूतुला’

◻️ घुलेवाडी येथील ​महायुती कार्यकर्त्याची ‘नवसपुर्ती’

​संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील कानिफनाथ महाराज यात्रोत्सवाचे औचित्य साधून शिवसेना, युवासेना आणि महायुती कार्यकर्त्याच्या वतीने आमदार अमोल खताळ यांची त्यांच्या वजनाएवढ्या लाडूंनी ‘लाडूतुला’ करण्यात आली. विधानसभा निवडणुकीत खताळ यांना मिळालेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल नवस पूर्ण करण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

​निवडणुकीपूर्वी घुलेवाडीतील महायुती कार्यकर्त्यानी आमदार अमोल खताळ यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी कानिफनाथ महाराजांना साकडे घातले होते. हा नवस पूर्ण झाल्याच्या आनंदात, यात्रोत्सवाच्या दिवशी आमदार खताळ यांना वजन काट्यात बसवून त्यांच्या वजनाएवढे लाडू ठेवण्यात आले. यावेळी परिसरातील भाविक आणि कार्यकर्त्यानी मोठी गर्दी केली होती. “कानिफनाथ महाराज की जय” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. तुलेसाठी वापरलेले सर्व लाडू नंतर उपस्थित भाविकांना प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले.

​या सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष वैशाली राऊत, शिवसेना शाखाप्रमुख शरद पानसरे, सीताराम पानसरे, स्वरूप राऊत, स्वप्निल राऊत, संजय पानसरे, राजश्री वाकचौरे, सारंगधर पानसरे, कैलास काशीद, बाळासाहेब राऊत, सतीश भेंडाळे, ओंकार राऊत, विकास राऊत, शुभम सातपुते, विशाल फटांगरे यांच्यासह महायुतीचे असंख्य कार्यकर्ते आणि घुलेवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​“जनतेने दिलेल्या अपार प्रेम, विश्‍वास आणि पाठिंब्यामुळेच मला संगमनेर तालुक्याचे लोकप्रतिनिधित्व करण्याची अमूल्य संधी मिळाली आहे. ही जबाबदारी माझ्यासाठी केवळ पद नसून, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे एक मोठे कर्तव्य आहे. तालुक्याचा सर्वागीण विकास करणे, प्रत्येक घटकापर्यत प्रगती पोहोचवणे आणि सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावणे हेच माझे मुख्य ध्येय आहे. घुलेवाडीकरांनी केलेला सन्मान आणि दाखवलेले प्रेम हे माझ्यासाठी प्रेरणादायी असून, यामुळे मला अधिक जोमाने आणि निष्ठेने काम करण्याची ऊर्जा मिळते.” अशी प्रतिक्रिया आमदार अमोल खताळ यांनी याप्रसंगी दिली.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !