​गुढीपाडवा हा सण प्रगतीचा संकल्प करण्याचा दिवस - आमदार अमोल खताळ

संगमनेर Live
0
गुढीपाडवा हा सण प्रगतीचा संकल्प करण्याचा दिवस - आमदार अमोल खताळ

◻️ कुटुंबीयांसमवेत उभारली पारंपरिक पद्धतीने गुढी

​संगमनेर LIVE | गुढीपाडवा हा सण म्हणजे नवे संकल्प, नवी ऊर्जा आणि आशा घेऊन येणारा प्रेरणादायी क्षण आहे. हा दिवस आपल्या समृध्द संस्कृतीची आणि हिंदू अस्मितेची प्रखर आठवण करून देणारा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, असे गौरवपूर्ण उद्गार आमदार अमोल खताळ यांनी काढले.

​हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आमदार खताळ यांनी आपल्या ‘साई हर्ष’ या निवासस्थानी कुटुंबीयांसमवेत पारंपरिक पद्धतीने गुढी उभारून नववर्षाचे जंगी स्वागत केले. यावेळी त्यांच्या समवेत पत्नी सौ. नीलम खताळ, बंधू राहुल खताळ आणि इतर कुटुंबीय उपस्थित होते.

​याप्रसंगी बोलताना आमदार खताळ म्हणाले की, “गुढीपाडवा हा सण केवळ दिनदर्शिकेतील नवीन वर्षाची सुरुवात नसून, तो नवीन सकारात्मक विचार आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. या दिवशी आपण उभारलेली गुढी ही विजय, समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक आहे.”

​आमदार खताळ यांनी या निमित्ताने समस्त नागरिकांना शुभेच्छा देताना म्हटले की, “या नववर्षात सर्वाच्या जीवनात सुख, समाधान, उत्तम आरोग्य, यश आणि भरभराट नांदो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येत आनंद, एकोपा आणि सकारात्मकतेने हे नववर्ष साजरे करावे.” असे आवाहन केले.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !