आश्‍वी महाविद्यालयात रक्तदान शिबिरात २९ पिशव्या रक्त संकलन!

संगमनेर Live
0
आश्‍वी महाविद्यालयात रक्तदान शिबिरात २९ पिशव्या रक्त संकलन!

◻️ ​महिला दिनानिमित्त विद्यार्थिनींना आरोग्याचे धडे


​संगमनेर LIVE | पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मरणार्थ आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संगमनेर तालुक्यातील आश्‍वी खुर्द येथील कला, वाणिज्य, विज्ञान व बीसीएस महाविद्यालयात मंगळवारी (दि. १०) भव्य रक्तदान शिबिर आणि महिलांच्या आरोग्य व पोषण विषयक विशेष मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

​‘रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ हा उदात्त संदेश देत समाजात रक्तदानाबाबत व्यापक जनजागृती व्हावी आणि गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या मुख्य उद्देशाने या समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि परिसरातील नागरिकांनी स्वेच्छेने व मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकी जपली. यावेळी एकूण २९ पिशव्या रक्त संकलित करण्यात आले.

डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज (विळदघाट, अहिल्यानगर) यांच्या विशेष सहकार्याने या शिबिर पार पडले. याप्रसंगी डॉ. नीलम सावळे, डॉ. भागवत तौर आणि डॉ. गौतम सगलगिळे यांनी उपस्थित विद्यार्थिनींना अनमोल मार्गदर्शन केले. विशेषतः विद्यार्थिनींमध्ये आढळणाऱ्या ‘हिमोग्लोबिन'च्या कमतरतेची कारणे आणि त्याचे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम यावर त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला. तसेच, संतुलित आहार, आरोग्याची योग्य काळजी, नियमित वैद्यकीय तपासणी आणि पोषणाचे महत्त्व याबाबत शास्त्रशुद्ध माहिती दिली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य देविदास दाभाडे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिला सबलीकरण कक्षाच्या समन्वयक प्रा. नीतू मांढरे यांनी प्रास्ताविक करून उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्याचे स्वागत केले. तर, आरोग्य समितीचे समन्वयक प्रा. मोईन पटेल यांनी सर्वाचे आभार मानले. याप्रसंगी शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !