ॲसिड हल्ला करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करा - आमदार अमोल खताळ

संगमनेर Live
0
ॲसिड हल्ला करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करा -  आमदार अमोल खताळ

◻️‘​प्रवरा रुग्णालयात’ भेट देऊन जखमी मुलीच्या प्रकृतीची घेतली माहिती 

​संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील एका गावातील सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याने संपूर्ण तालुका हादरला आहे. ही घटना अत्यंत संतापजनक आणि दुर्दैवी असल्याची तीव्र प्रतिक्रिया आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केली असून, नराधम आरोपीला शोधून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत.

​घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार अमोल खताळ यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, सरपंच श्रीनाथ थोरात, ग्रामपंचायत सदस्य सुमित काशीद, गणेश काशीद आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. आमदारांनी पोलीस अधिकाऱ्यांकडून घटनेचा सविस्तर आढावा घेतला आणि तपास पथकाला जलद तपासाचे निर्देश दिले.

​हल्ल्यात जखमी झालेल्या चिमुरडीवर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आमदार खताळ यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन पीडित मुलीची भेट घेतली आणि तिच्या प्रकृतीची डॉक्टरांकडून माहिती घेतली. सध्या मुलीची प्रकृती स्थिर असून उपचारांना योग्य प्रतिसाद मिळत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यावेळी आमदारांनी पीडित कुटुंबाला धीर देत त्यांना पूर्णपणे न्याय मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले.

“सहावीत शिकणाऱ्या निष्पाप चिमुरडीवर झालेला हा हल्ला पाहून मन सुन्न झाले आहे. ही अत्यंत अमानुष व निंदनीय घटना असून अशा गुन्हेगारांना समाजात जागा नाही. आरोपीची कोणतीही गय केली जाणार नाही. मी स्वतः या प्रकरणाचा पाठपुरावा करून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल, हे पाहीन. पीडितेच्या उपचारांसाठी आणि पुनर्वसनासाठी शासन स्तरावरून सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. आम्ही पूर्ण ताकदीनिशी पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभे आहोत.” असे आमदार अमोल खताळ यांनी म्हटले आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !