लोणी खुर्द चे सरपंच व सदस्यांना दिलासा; अपात्रतेचे अपील फेटाळले!

संगमनेर Live
0
लोणी खुर्द चे सरपंच व सदस्यांना दिलासा; अपात्रतेचे अपील फेटाळले!

​◻️ सरपंच जनार्दन घोगरे आणि सदस्या आशाताई आहेर यांचे सदस्यत्व कायम

संगमनेर LIVE (​राहाता) | राहाता तालुक्यातील लोणी खुर्द ग्रामपंचायतीच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या अपात्रतेच्या प्रकरणाला आता पूर्णविराम मिळाला आहे. सरपंच जनार्दन घोगरे व सदस्या सौ. आशाताई आहेर यांच्या सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भात दाखल करण्यात आलेले अपील नाशिकचे अपर विभागीय आयुक्त अजय मोरे यांनी फेटाळले आहे. या निर्णयामुळे संबंधित लोकप्रतिनिधींना मोठा दिलासा मिळाला आहे.

​लोणी खुर्द चे सरपंच जनार्दन घोगरे आणि सदस्या आशाताई आहेर यांच्यावर अतिक्रमणाचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांच्या आधारे त्यांना अपात्र ठरवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून संबंधितांच्या बाजूने निकाल दिला होता. मात्र, या निर्णयाला नाशिकच्या अपर विभागीय आयुक्तांकडे आव्हान दिले होते.

​महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १४ ज ३ अन्वये या अपीलाची सुनावणी घेण्यात आली. मात्र, या प्रकरणातील पाठपुराव्याचा अभाव आणि पुराव्यांची कमतरता लक्षात घेता, अपर विभागीय आयुक्त अजय मोरे यांनी हे अपील फेटाळण्याचा निर्णय दिला. ​संबंधित ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्यानंतर हा निकाल समोर आला आहे. तरीही, या निर्णयामुळे घोगरे आणि आहेर यांना अपात्रतेबाबत मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान ​या प्रकरणात सरपंच जनार्दन घोगरे व सदस्या सौ. आशाताई आहेर यांच्या वतीने ॲड. सागर ब्राह्मणे यांनी कायदेशीर बाजू मांडली. या निकालानंतर तालुक्यातील लोणी खुर्द ग्रामपंचायत पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहेत.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !