क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना १९९ व्या जयंतीनिमित्त सोनगावमध्ये अभिवादन!
◻️स्त्री शिक्षणाचे जनक आणि थोर समाज सुधारकाच्या स्मृतींना उजाळा
संगमनेर LIVE (सात्रळ) | स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, दीन-दलितांच्या आणि शोषितांच्या अंधकारमय जीवनात शिक्षणाचा प्रकाश पसरवणारे थोर समाजसुधारक, क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांची १९९ वी जयंती राहुरी तालुक्यातील सोनगाव येथे अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. स्त्री सक्षमीकरणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या या महामानवाच्या कार्याचे स्मरण यावेळी करण्यात आले.
सोनगाव येथील मुख्य महात्मा फुले चौकात या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने संपूर्ण चौक आणि ध्वजस्तंभ परिसरात आकर्षक सजावट आणि ध्वजाची सजावटीची चौकट करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. यानंतर महात्मा फुलेंनी दिलेल्या समतेच्या आणि शिक्षणाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.
दरम्यान याप्रसंगी सुभाष अंत्रे, मच्छिंद्र अंत्रे, पाराजी धनवट, सुभाष नामदेव अंत्रे, प्रकाश ताठे, बाळासाहेब अंत्रे, भाऊसाहेब अंत्रे, राजेंद्र अनाप, नारायण धनवट, अलका शिंदे, सुभाष शिंदे, एजाज तांबोळी, संतोष अंत्रे, बाळासाहेब दिघे, बंटी कानडे, महमंद तांबोळी, कैलास अनाप, रमेश अनाप, तात्यासाहेब शिंदे, विनोद अंत्रे, सुनिल अंत्रे, राजन ब्राम्हणे, विजय कानडे, संजय कानडे, शरद अंत्रे, निलेश अंत्रे, सूर्यभान शिंदे, प्रशांत अंत्रे, किरण अंत्रे, विनोद अंत्रे, बाळासाहेब अंत्रे, महेश अंत्रे, अमोल अंत्रे, गणेश शिंदे, अक्षय अनाप, दिलीप शिंदे, कुमार अंत्रे यांच्यासह सोनगाव आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती पत्रकार समर्थ वाकचौरे यांनी कळवली आहे.