दाढ खुर्द येथे ‘गुरुचरित्र पारायण’ सोहळ्याला प्रारंभ!

संगमनेर Live
0
दाढ खुर्द येथे ‘गुरुचरित्र पारायण’ सोहळ्याला प्रारंभ!

◻️ बुधवारी महाप्रसादाने होणार सांगता

संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथील श्री स्वामी समर्थ सेवा, अध्यात्मिक विकास व बालसंस्कार (दिंडोरी प्रणीत) केंद्रात ‘श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी’ सप्ताह निमित्ताने आयोजित ‘गुरुचरित्र पारायण’ सोहळ्याचा ​मगलमय वातावरणात प्रारंभ झाला आहे.

सोहळ्याचे औचित्य साधून केंद्र परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून संपूर्ण परिसर भक्तीने न्हाऊन निघाला आहे. गुरुवार, दि. ९ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता भूपाळी आरतीच्या मंगल स्वरांनी सोहळ्याला सुरुवात झाली. त्यानंतर विधिवत श्री गुरुचरित्र वाचनास आरंभ करण्यात आला. या मंगलप्रसंगी परिसरातील महिला व पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिनांक ९ एप्रिल ते १५ एप्रिल २०२६ या सात दिवसांच्या कालावधीत केंद्रात विविध अध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. यामध्ये दररोज होणाऱ्या श्री गुरुचरित्र पारायणासोबतच भाविकांकडून सामुदायिक रित्या स्वामीचरित्र आणि श्री दुर्गा सप्तशतीचे वाचन केले जाणार आहे. या व्यतिरिक्त केंद्रात नियमितपणे मंत्र जप, ध्यानधारणा आणि सकाळी व सायंकाळी सामुदायिक आरती व प्रार्थना असे विविध भक्तीमय उपक्रम राबवून संपूर्ण वातावरण चैतन्यमय केले जाणार आहे.

या सप्ताह सोहळ्याची सांगता बुधवार, दिनांक १५ एप्रिल रोजी होणार आहे. सकाळी १०.३० वाजता ‘महानैवेद्य आरती’ संपन्न होईल आणि त्यानंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील जास्तीत जास्त भाविकांनी या पारायण सोहळ्यात सहभागी होऊन आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग अनुभवावा. असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !