खळी आणि झरेकाठीत श्रामणेर भिक्खू संघाचे स्वागत
◻️ महिलांकडून पाद्यपूजन आणि भोजन दान!
खळी गावात भिक्खू संघाच्या आगमनावेळी सकाळपासूनच पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेले स्त्री-पुरुष स्वागतासाठी सज्ज होते. यावेळी भिक्खू संघाच्या मार्गावर ग्रामस्थांनी फुलांचे आच्छादन केले होते. फुलांच्या पाकळ्यांवरून चालत भिक्खू संघ कार्यक्रम स्थळी पोहोचला. शोभा वाघमारे यांच्यासह महिलांनी भिक्खूंचे पाय धुऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी उपस्थित जनसमुदायाने बुध्द आणि महामानवच्या नावाचा जयघोष केला.
या प्रसंगी केंद्रीय शिक्षक राजेंद्र पिंपळे यांनी उपस्थित अनुयायांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौध्दाचार्य सुशील मुन्तोडे यांनी केले.
तसेच, झरेकाठी येथील ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने एकत्र येत भिक्खू संघाचे स्वागत केले. अर्चना म्हंकाळे, मनीषा वाघमारे, अनिता वाघमारे, वर्षा म्हंकाळे, सायली वाघमारे, कमल वाघमारे, नंदा म्हंकाळे, आशा म्हंकाळे, पुनम म्हंकाळे यांच्यासह महिला भगिनींनी भिक्खू संघाचे पाय धुवून आणि रस्त्यावर फुलांच्या पायघड्या घालून भक्तिभाव व्यक्त केला. बौध्दाचार्य श्रामणेर शिबिर व धम्म दीक्षा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित या भोजन दान कार्यक्रमात संपूर्ण गाव सहभागी झाले होते.
यावेळी श्रेया मुन्तोडे, कावेरी मुन्तोडे, हर्षल पवार आणि प्रशांत वाघमारे यांनी प्रवास व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली. झरेकाठी येथील कार्यक्रमासाठी सिध्दांत म्हंकाळे, सागर म्हंकाळे, मदन म्हंकाळे, अमोल वाघमारे, चंद्रकांत वाघमारे, याकोब म्हंकाळे, राजू म्हंकाळे, जॉन म्हंकाळे, अलका वाघमारे, सुनील वाघमारे, ऋतुजा वाघमारे, स्नेहल म्हंकाळे यांसह अनेक कार्यकर्त्यानी विशेष परिश्रम घेतले.
दरम्यान याप्रसंगी माजी जिल्हाध्यक्ष यमदास तथा वाय. एल. मुन्तोडे, तालुका सरचिटणीस राजू मुन्तोडे, बौध्दाचार्य रोहिदास मुन्तोडे, सुशील मुन्तोडे, प्रणय मुन्तोडे आदि उपस्थित होते.