अहिल्यानगरच्या उड्डाणपुलाच्या कामाची डॉ. सुजय विखे पाटलांकडून पाहणी

संगमनेर Live
0
अहिल्यानगरच्या उड्डाणपुलाच्या कामाची डॉ. सुजय विखे पाटलांकडून पाहणी

◻️​ वाहतूक कोंडीतून मुक्ततेसाठी पुलाचे काम युध्दपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश


संगमनेर LIVE (​अहिल्यानगर) |
शहराच्या सर्वागीण विकासासाठी कटिबध्द असलेल्या डॉ. सुजय विखे पाटील यांनी आज अहिल्यानगर शहरातील विविध विकासकामांची सखोल पाहणी केली. प्रामुख्याने, शहराच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेचा कणा ठरू पाहणाऱ्या सह्याद्री चौक ते सनफार्मा चौक दरम्यानच्या उड्डाणपुलाच्या कामकाजाचा त्यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन आढावा घेतला. 

गेल्या काही वर्षात अहिल्यानगर शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला आहे, ज्यामुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला होता. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी हा महत्त्वाकांक्षी उड्डाणपूल प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

​या पाहणी दौऱ्यादरम्यान डॉ. विखे पाटील यांनी पुलाच्या बांधकामाची सद्यस्थिती, खांबांची उभारणी आणि कामाचा वेग यांचा बारकाईने अभ्यास केला. यावेळी त्यांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधून प्रकल्पातील तांत्रिक बाबी समजून घेतल्या. हा प्रकल्प नियोजित वेळेतच पूर्ण व्हावा याकडे लक्ष देण्याचे निर्देश देतानाच त्यांनी स्पष्ट केले की, कामाचा वेग वाढवताना गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाऊ नये. कामाचा दर्जा उत्तम राखण्याच्या सूचना देतानाच त्यांनी पुलाच्या परिसरात भविष्यातील वाढती लोकसंख्या आणि वाहतूक लक्षात घेऊन आवश्यक त्या सर्व सोयीसुविधांचे आतापासूनच नियोजन करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

​सह्याद्री चौक ते सनफार्मा चौक हा मार्ग शहरातील अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे. या उड्डाणपुलामुळे शहरांतर्गत होणारी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. "हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर नागरिकांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि जलद प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल,” असा विश्‍वास डॉ. सुजय विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. 

या पाहणी दौऱ्यावेळी विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विखे पाटील यांच्या या धडक पाहणीमुळे विकासकामांना गती मिळणार असल्याने शहरात समाधान व्यक्त होत आहे.

​“शहराचा विकास हाच आमचा ध्यास आहे. उड्डाणपुलाचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करून अहिल्यानगरकरांना वाहतूक कोंडीतून मुक्त करणे हे आमचे प्राधान्य आहे.” असे डॉ. सुजय विखे पाटील याप्रसंगी म्हणाले.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !