अभियांत्रिकी क्षेत्रात प्रगतीसाठी कौशल्याधारित शिक्षणाची गरज - दीपक जगदाळे

संगमनेर Live
0
अभियांत्रिकी क्षेत्रात प्रगतीसाठी कौशल्याधारित शिक्षणाची गरज - दीपक जगदाळे

◻️ प्रवरेत ‘प्रीकॉन २०२६’ राष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न


संगमनेर LIVE (​लोणी) |
“अभियांत्रिकी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत आहे. अशा काळात विद्यार्थ्यानी केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता कौशल्याधारित शिक्षणावर भर देणे आवश्यक आहे. स्वतःच्या कौशल्याच्या जोरावरच उद्याचे अभियंते जागतिक स्पर्धेत प्रगती साधू शकतील,” असे प्रतिपादन माजी विद्यार्थी दीपक जगदाळे यांनी केले. 

लोणी येथील लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयात विविध विभागांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘प्रीकॉन २०२६’ या चौथ्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

​या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने, परिषद समन्वयक डॉ. सतीश तुरकणे, डॉ. पंकज चित्ते, डॉ. सीमा लव्हाटे, डॉ. मिनीनाथ बेंद्रे, डॉ. वैशाली विखे, डॉ. सुनिल मिसाळ आणि रजिस्ट्रार नकुल तांबे उपस्थित होते.

​या परिषदेच्या तांत्रिक सत्रांमध्ये मार्गदर्शन करताना दीपक जगदाळे यांनी ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील तांत्रिक बदल आणि भविष्यातील संधींवर सखोल प्रकाश टाकला. विद्यार्थ्यानी केवळ पदवी मिळवण्यावर लक्ष न देता उद्योगांच्या बदलत्या गरजा ओळखून स्वतःला प्रशिक्षित करावे, असे आवाहन त्यांनी केले. 

याचवेळी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांनी विद्यार्थ्यामधील उद्योजकता वाढीस लागण्यावर भर दिला. विद्यार्थ्यानी केवळ नोकरीच्या मागे न धावता नवनवीन कल्पनांवर काम करून ‘नोकरी देणारे’ उद्योजक बनावे आणि समाजासाठी मूल्यनिर्मिती करावी, असे सांगतानाच संस्था अशा प्रयत्नांना पूर्ण पाठबळ देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

​या राष्ट्रीय परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, देशातील ४ राज्यांमधील ४० हून अधिक नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांतून १३५ पेक्षा जास्त संशोधक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. परिषदेत एकूण १०५ उच्च दर्जाचे संशोधन निबंध सादर करण्यात आले. 

दरम्यान, यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक डॉ. सतीश तुरकणे यांनी केले, ज्यामध्ये त्यांनी बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात संशोधनाचे महत्त्व विषद केले. शेवटी समन्वयक डॉ. राजेश भांबारे यांनी आभार मानले. या परिषदेमुळे विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानासोबतच संशोधनाच्या जागतिक प्रवाहांची ओळख झाली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !