हनुमंतगाव येथे महात्मा जोतिबा फुले यांची १९९ वी जयंती साजरी

संगमनेर Live
0
हनुमंतगाव येथे महात्मा जोतिबा फुले यांची १९९ वी जयंती साजरी

​◻️ सांस्कृतिक कार्यक्रम आणि फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर दुमदुमला

संगमनेर LIVE (​सात्रळ) | राहाता तालुक्यातील हनुमंतगाव येथे क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांची १९९ वी जयंती अत्यंत उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महात्मा फुले यांच्याबद्दलचा आदर, प्रेम आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरीक एकवटले होते.

येथील फुले युवा मंच, ज्ञानदीप वाचनालय, ग्रामपंचायत प्रशासन आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यानी या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित पोवाडे आणि भाषणांनी उपस्थितांची मने जिंकली. जयंतीचे औचित्य साधून भव्य फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

यावेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव केला. “क्रांतीसुर्य जोतिबा फुले यांनी सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता निवारण आणि जाती व्यवस्थेच्या निर्मूलनासाठी आयुष्य वेचले. स्त्रियांना आणि मागासवर्गीयांना शिक्षणाची दारे खुली करून त्यांनी आधुनिक साक्षर समाजाचा पाया रचला,” असे प्रतिपादन वक्त्यांनी केले. तसेच ​आजच्या आधुनिक समाजात ज्योतिबांचे विचार हीच खरी काळाची गरज असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. 

दरम्यान, यावेळी संचालक अशोक घोलप, कृष्णागर जेजुरकर, आदिवासी नेते ज्ञानेश्‍वर अहिरे, संरपंच मनीषा माळी यांच्यासह प्राजक्ता अनाप, रुबिना शेख, दीपक घोलप, सुभाष ब्राम्हणे, विकास अनाप, गोरक्षनाथ ब्राम्हणे, डॉ. लक्ष्मण कानडे, पुंजाराम गावडे, भिमराज घोलप, सचिन पवार, अतुल कुलकर्णी, भागवत ब्राम्हणे, रविंद्र पर्वत, शुभम चिंधाडे, संतोष राहींज, प्रा. पवार, प्रा. नवगिरे, सोमनाथ जेजुरकर, शब्बीर शेख, उत्तम घोलप, नवनाथ जेजुरकर, संजय पर्वत, किशोर अनाप, विकास गायकवाड, अभिषेक तुंबारे, बाळासाहेब ब्राम्हणे, सुजित पर्वत यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला, युवक आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती पत्रकार समर्थ वाकचौरे यांनी कळवली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !