बाबासाहेबांचे विचार आत्मसात करून महिलांनी संघटित व्हावे - साधना मुन्तोडे

संगमनेर Live
0
बाबासाहेबांचे विचार आत्मसात करून महिलांनी संघटित व्हावे - साधना मुन्तोडे

◻️ ​आश्‍वी खुर्द येथे सांस्कृतिक कार्यक्रम आणि भाषणांनी जिंकली मने

संगमनेर LIVE | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य स्त्री-पुरुष समानतेच्या मूल्यांसाठी वेचले आहे. त्यांचे हे क्रांतिकारी कार्य पुढे नेण्यासाठी आता महिलांनी अधिक सक्षमपणे आणि जिद्दीने पुढे येण्याची गरज आहे. त्यासाठी डॉ. बाबासाहेबांचे विचार आत्मसात करून महिलांनी संघटित व्हावे, असे प्रतिपादन साधना मुन्तोडे यांनी केले.

​संगमनेर तालुक्यातील आश्‍वी खुर्द येथे ‘दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’च्या महिला ग्राम शाखेच्या वतीने भगवान गौतम बुध्द आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मुन्तोडे बोलत होत्या.

​कार्यक्रमाची सुरुवात ग्राम शाखा अध्यक्ष दत्तराज मुन्तोडे यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहणाने झाली. सरपंच सौ. अलका गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ग्राम शाखा अध्यक्ष पूजा मुन्तोडे, बाबासाहेब भवर, संजय गायकवाड, गणेश भडकवाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी ​सांस्कृतिक कार्यक्रमाात आरुषी मुन्तोडे, सुभजीत मुन्तोडे आणि श्रेया मुन्तोडे यांनी सादर केलेल्या पोवाड्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तसेच कल्याणी कदम, संगिता मुन्तोडे आणि वर्षा मुन्तोडे यांनी डॉ. बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारी भाषणे सादर केली.

​सरचिटणीस राजेंद्र मुन्तोडे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. अध्यक्षीय भाषणात दत्तराज मुन्तोडे यांनी आगामी काळात होणाऱ्या ‘श्रामणेर’ आणि ‘बौध्द धम्म दीक्षा’ सोहळ्याचे नियोजन स्पष्ट केले. समाजातील जास्तीत जास्त नागरिकांनी या धम्म कार्यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

यावेळी ​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशिल मुन्तोडे यांनी केले, तर सिध्दार्थ मुन्तोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. 

दरम्यान, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीरंग कदम, हर्षल पवार, बबन मुन्तोडे, अलिशा मुन्तोडे, रेणुका मुन्तोडे, पुनम मुन्तोडे, सुधाकर मुन्तोडे, एकनाथ मुन्तोडे, लैला मुन्तोडे, पुनम मकासरे, कावेरी मुन्तोडे, सिध्देश मुन्तोडे, अर्जुन मुन्तोडे, साहिल मुन्तोडे, प्रसाद मुन्तोडे, गौरव मुन्तोडे, तेजस माने, प्रणव मुन्तोडे, यशराज मुन्तोडे आदिंनी विशेष परिश्रम घेतले.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !