पानेगांवमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

संगमनेर Live
0
पानेगांवमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

◻️​तोफांच्या सलामीत ध्वज अनावरण; भिमगीतांच्या स्वरांनी परिसर दुमदुमला

संगमनेर LIVE (​पानेगांव) | नेवासे तालुक्यातील पानेगांव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. मंगळवारी सकाळी ९ वाजल्यापासून विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव करण्यात आला.

​जयंतीनिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौथऱ्यावर आकर्षक फुलसजावट करण्यात आली होती. परिसरामध्ये सडा-रांगोळी काढून सुशोभीकरण करण्यात आले. सकाळी आयोजित करण्यात आलेल्या भिमगीतांच्या कार्यक्रमाने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी तोफांच्या सलामीने धम्मचक्र ध्वज अनावरण करण्यात आले. 

​कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय पानेगांव येथे लोकनियुक्त सरपंच सौ. निकीता भोसले-आंबेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

​भिम जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बी. आर. वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनिल भवार, विजय वाघमारे, राजेंद्र शेंडगे आणि संजय पवार यांनी या सर्व कार्यक्रमाचे सुदंर नियोजन केले होते.

दरम्यान, ​या सोहळ्याप्रसंगी सोनई करजगांव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष संजय जंगले, ग्रामपंचायतीचे जेष्ठ सदस्य दत्तात्रय घोलप, संस्थेचे मार्गदर्शक जालिंदर जंगले, माजी उपसरपंच जयवंत गुडधे, हरिभाऊ जंगले, डॉ. काकडे, गजानन चिंधे, बारकू जंगले, पांडुरंग जंगले, सुनिल भवार, बी. वाय. वाघ, संजय पवार, राजेंद्र शेंडगे, बापूराव जंगले, दिलीप वाघमारे, सुभाष गागरे, अंकुश जिवरक, सुदाम जंगले, शिवाजी जंगले, नामदेव चिंधे, बबनराव जंगले, बाळासाहेब वाघमारे, संजय वाघमारे, विजय वाघमारे, विजय जंगले, बाळासाहेब वतनदार यांच्यासह गावातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. अशी माहिती पत्रकार बाळासाहेब नवगिरे यांनी कळवली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !