माळेवाडी सात्रळ येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

संगमनेर Live
0
माळेवाडी सात्रळ येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

◻️ ​विद्यार्थ्यानी साकारली फुले दांपत्याची वेशभूषा; पुस्तकांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी

संगमनेर LIVE (​सात्रळ) | सत्यशोधक समाजाचे संस्थापक आणि थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त राहुरी तालुक्यातील माळेवाडी सात्रळ येथे विविध स्तुत्य उपक्रम राबवून जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थित सर्व मान्यवरांनी अभिवादन केले. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना महात्मा फुलेंच्या कार्याचा गौरव केला आणि समाजातील अज्ञान व अनिष्ट रूढी विरुध्द त्यांनी दिलेला लढा आजही तितकाच प्रेरणादायी असल्याचे नमूद केले.

​यावेळी काळेवाडी येथील जिल्हापरिषद शाळेतील विद्यार्थ्यानी महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा परिधान करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. केवळ वेशभूषाच नव्हे, तर शाळेतील या बालगोपाळांनी महात्मा फुलेंच्या जीवनपटावर अत्यंत प्रभावीपणे आपले मनोगत व्यक्त करून त्यांच्या विचारांची मांडणी केली.

​जयंती उत्सवाचे औचित्य साधून संत श्री सावता महाराज तरुण मित्र मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यामध्ये वाचन संस्कृती वाढावी आणि महापुरुषांचे विचार तळागाळापर्यत पोहोचावेत या उद्देशाने महात्मा फुलेंच्या जीवनावर आधारित पुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच क्रांतिसूर्य प्रतिष्ठानच्या वतीने कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व ग्रामस्थांना व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला.

​याप्रसंगी जिल्हा परिषदेचे शिक्षक जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. कार्यक्रमाला अ‍ॅड. बिपिन ताठे, प्रकाश ताठे, वसंतराव डुकरे, किरण कडू, जे. पी. जोर्वेकर, रमेश पन्हाळे, अतुल ताठे, संजय नागरे, शहाजी शिंदे, कारभारी डुकरे, प्रमोद नालकर, विजय डुकरे, नामदेव शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय निधाने, चांगदेव गाडेकर यांच्यासह ग्रामस्थ, तरुण मंडळाचे कार्यकर्ते आणि विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती पत्रकार समर्थ वाकचौरे यांनी कळवली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !