तरुणांना रोजगार देण्यासाठी महायुती सरकार कटिबध्द - आमदार अमोल खताळ

संगमनेर Live
0
तरुणांना रोजगार देण्यासाठी महायुती सरकार कटिबध्द - आमदार अमोल खताळ 

◻️ संगमनेर येथील युवासेनेच्या रोजगार मेळाव्याला तरूणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद

​संगमनेर LIVE | संगमनेरमध्ये एमआयडीसी सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. या मंजुरीमुळे तालुक्यातील औद्योगिक विकासाचे नवे पर्व सुरू होणार असून, स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. महायुती सरकार आणि युवासेना याकामी पूर्णपणे कटिबध्द असल्याचे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले आहे.

आमदार खताळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसीच्या मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. या पाठपुराव्याला यश आले असून, आता एमआयडीसीच्या स्थापनेबाबतचे अधिकृत नोटिफिकेशन लवकरच निर्गमित होणार आहे.

शहरात युवासेनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात तरुणांचा मोठा प्रतिसाद दिसून आला. या मेळाव्यात तब्बल ६०० तरुण-तरुणींनी मुलाखती दिल्या. यातील १२५ जणांची प्राथमिक निवड करण्यात आली असून, काहींना तर जागेवरच ऑफर लेटर्स प्रदान करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना आमदार खताळ म्हणाले, “संगमनेरमधील तरुणांना त्यांच्या शिक्षण आणि कौशल्यानुसार नोकरी मिळावी हाच आमचा ध्यास आहे. पारेगाव येथील उद्योगांच्या माध्यमातून ६०० ते ६५० युवकांना रोजगार देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.” यावेळी त्यांनी उपस्थितांना केवळ नोकरीवर अवलंबून न राहता स्वतः उद्योजक बनून इतरांना रोजगार देण्याचे आवाहन केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात कौशल्याधारित रोजगाराला विशेष प्रोत्साहन दिले जात आहे. याचाच भाग म्हणून आयटीआय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याना संगमनेरमध्ये विशेष संधी उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे आमदार खताळ यांनी नमूद केले. तसेच सहकार औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून तरुण पिढीला उद्योग क्षेत्रात सक्षमपणे उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. असे सांगितले.

दरम्यान, ​या रोजगार प्रक्रियेसाठी तब्बल १ हजार ८०० युवकांनी नोंदणी केली होती. बीएससी, एमएससी, बीसीए आणि आयटीआय अशा विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या युवकांना या माध्यमातून हक्काच्या नोकऱ्या उपलब्ध होत असल्याने संगमनेरच्या तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. याप्रसंगी युवा सेनेसह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !