​प्रवरेच्या वेदांत बोरावके याला नासाकडून विशेष प्रशस्तीपत्र!

संगमनेर Live
0
प्रवरेच्या वेदांत बोरावके याला नासाकडून विशेष प्रशस्तीपत्र!

◻️ जागतिक सायबर सुरक्षेत प्रवरेच्या विद्यार्थ्याचा दबदबा

संगमनेर LIVE (​लोणी) | लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी वेदांत बोरावके याने सायबर सुरक्षा क्षेत्रात मोलाचे संशोधन करून अमेरिकेच्या ‘नॅशनल एरोनॉटिक्स अ‍ॅड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन' (नासा) कडून विशेष प्रशस्तीपत्र मिळवत महाविद्यालयाचा आणि महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला आहे.

वेदांतने नासाच्या ‘व्हल्नरॅबिलिटी डिस्क्लोजर प्रोग्राम' अंतर्गत अत्यंत क्लिष्ट अशा सुरक्षा त्रुटींचा शोध लावला आणि त्याबाबत जबाबदारीने अहवाल सादर केला. सायबर सुरक्षा क्षेत्रात त्याने केलेल्या या संशोधनाची दखल थेट नासासारख्या जागतिक संस्थेने घेतली आहे. केवळ नासाच नव्हे, तर नोकियासारख्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या सुरक्षा संशोधनामध्येही वेदांतने आपल्या बुध्दिमत्तेची चुणूक दाखवली आहे.

वेदांतच्या या यशामुळे संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या हस्ते वेदांतचा विशेष सत्कार करण्यात आला. “विद्यार्थ्यानी केवळ पुस्तकी शिक्षणावर अवलंबून न राहता, आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात भरारी घ्यावी, याचे वेदांत हे उत्तम उदाहरण आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

वेदांतच्या या यशात इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागाच्या प्रमुख डॉ. सीमा लव्हाटे आणि सर्व प्राध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

दरम्यान, वेदांतच्या या जागतिक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, सौ. शालिनीताई विखे, डॉ. सुजय विखे पाटील, डॉ. शिवानंद हिरेमठ, डॉ. प्रदीप दिघे, प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !