लोणीतील टायगर ग्रुपच्या सदस्यांनी अनाथ मुलांसोबत साजरा केला वाढदिवस
◻️ १०० चिमुरड्यांना शालेय साहित्य आणि अन्नदान!
संगमनेर LIVE (लोणी) | टायगर ग्रुप लोणीचे अध्यक्ष पै. आण्णा ब्राम्हणे यांच्या वाढदिवसानिमित्त नुकतेच गुहा येथील गंगाधर बाबा छात्रालय, अनाथ आश्रम येथे सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अन्नदान व आश्रमातील विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत आश्रमातील सुमारे १०० विद्यार्थ्याना वह्या, पेन, पेन्सिल, स्कूल बॅग व इतर शालेय वस्तूंचे वितरण करण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्याना भोजन देत वाढदिवस साध्या व समाजोपयोगी पद्धतीने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य पाहायला मिळाले. अनेकांनी टायगर ग्रुपच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
आश्रमाचे संचालक पप्पू सपकाळ यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “टायगर ग्रुपच्या माध्यमातून या आश्रमात कायम सामाजिक कार्यक्रम घेतले जातात. तान्हाजी जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांकडून आश्रमातील मुलांसाठी सातत्याने मदतीचा हात दिला जात असून, अशा उपक्रमांमुळे मुलांना आधार मिळत असल्यांचे त्यांनी सांगितले.
यावेळी टायगर गृप जिल्हाध्यक्ष पै. बंटी भिंगारदिवे यांनीही सामाजिक कार्याला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. वाढदिवस, उत्सव आणि आनंदाचे क्षण समाजातील गरजू घटकांसोबत साजरे करणे हीच खरी समाजसेवा आहे,” असे ते म्हणाले.
या प्रसंगी सुहास ब्राम्हणे, बाळा कुटे, धनु चव्हाण, विजय साबळे, मछिंद्र दराडे, अनिकेत खरात, विजय भोसले, महिंद्रा खरात, वैभव शेलार, मुरली पवार, सिध्दार्थ खरात, महेश खरात, करण गायकवाड, प्रतीक सोनवणे, मयूर वाघमारे, प्रणव कादंळकर, साईजीत बोर्डे, धिरज चितळे, यश क्षिरसागर, आकाश कुऱ्हे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, या कार्यक्रमाचे नियोजन व संयोजन टायगर ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी केले. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे परिसरात टायगर ग्रुपच्या कार्याचे कौतुक होत आहे.