पायरेन्सच्या दोन विद्यार्थ्याना थेट आफ्रिकेत १३.५६ लाखांचे पॅकेज!

संगमनेर Live
0
पायरेन्सच्या दोन विद्यार्थ्याना थेट आफ्रिकेत १३.५६ लाखांचे पॅकेज!

 ◻️‘बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर' पदी झाली निवड

संगमनेर LIVE (​लोणी) | ग्रामीण भागातील विद्यार्थ्याच्या स्वप्नांना आता आंतरराष्ट्रीय पंख फुटू लागले असून, लोणी येथील ‘पायरेन्स आयबीएमए’ संस्थेने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची छाप जागतिक पातळीवर उमटवली आहे. 

संस्थेच्या एमबीए विभागातील रितिक गायकवाड आणि ओंकार वर्पे या दोन विद्यार्थ्यानी थेट सेंट्रल आफ्रिकेतील अ‍ॅगोला देशात नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळवून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. संस्थेच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर प्रा. रेणुका तनपुरे यांनी ही माहिती दिली.

​या सुवर्णसंधीबाबत सविस्तर माहिती देताना प्लेसमेंट विभागाने सांगितले की, एमबीए विभागातील रितिक गायकवाड आणि ओंकार वर्पे या दोन्ही गुणवंत विद्यार्थ्याची सेंट्रल आफ्रिकेतील लुआंडा, अ‍ॅगोला येथील ‘हायफ्लेक्स कॉमर्सिओ जेराल (SU) एल.डी.ए.’ या नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये ‘बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर’ या अत्यंत जबाबदारीच्या पदावर निवड झाली आहे. या आंतरराष्ट्रीय नियुक्तीसाठी या दोन्ही युवकांना वार्षिक तब्बल १३.५६ लाख रुपयांचे अत्यंत आकर्षक व मानाचे वेतन पॅकेज मिळाले आहे. ग्रामीण पार्श्‍वभूमीतून आलेल्या या तरुणांनी थेट सात समुद्रापार मिळवलेल्या या यशामुळे संपूर्ण लोणी परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

​“ग्रामीण भागातील विद्यार्थ्यानी जागतिक स्तरावर मिळवलेले हे यश केवळ त्यांचे वैयक्तिक यश नसून संपूर्ण संस्थेसाठी अभिमानास्पद बाब आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत जागतिक स्पर्धेसाठी सक्षम बनवण्याचा आमचा प्रयत्न नेहमीच यशस्वी ठरत आहे.” असे संचालक डॉ. मोहसीन तांबोळी यांनी सांगितले.

दरम्यान, ​या उल्लेखनीय यशाबद्दल ​संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा ​सौ. शालिनीताई विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, ​डॉ. सुप्रिया ढोकणे विखे पाटील, सचिव ​डॉ. निलेश बनकर, ​संचालक डॉ. मोहसीन तांबोळी यांनी अभिनंदन केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !