सात्रळच्या किरण कडू यांची ‘रयत'च्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड!

संगमनेर Live
0
सात्रळच्या किरण कडू यांची ‘रयत'च्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड!

◻️ ज्येष्ठ नेते शरद ​पवाराकडून सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल

संगमनेर LIVE (​सात्रळ) | रयत शिक्षण संस्थेतील विशेष कार्याची आणि निस्वार्थ सेवेची दखल घेत, राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील किरण अरुण कडू यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. ९ मे रोजी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त सातारा येथे संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड सर्वानुमते जाहीर करण्यात आली.

​किरण कडू यांना समाजसेवेचे बाळकडू त्यांचे आजोबा, माजी आमदार कॉम्रेड पी. बी. कडू पाटील आणि वडील अरुण कडू यांच्याकडून मिळाले असून, तोच वारसा ते निस्वार्थपणे पुढे चालवत आहेत. त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या विविध प्रकल्पांसाठी आतापर्यत भरीव लोकवर्गणी व देणग्या मिळवून दिल्या आहेत.

विद्यार्थ्यामध्ये वाचन संस्कृती जोपासण्यासाठी वाचन प्रकल्प राबवणे, पर्यावरणासाठी वृक्षलागवड व संवर्धन करणे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि शालेय गुणवत्ता वाढीसाठी सातत्याने प्रयत्न करणे, अशा विविध आघाड्यांवर त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे, आजच्या धावपळीच्या युगात विद्यार्थ्याचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी त्यांनी क्रीडा विभागाच्या माध्यमातून गिर्यारोहणाची आवड निर्माण केली असून, विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून ते नेहमी यशस्वी व्यक्तिमत्त्वांची व्याख्याने आयोजित करत असतात.

​दरम्यान, या निवडीबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दिलीप वळसे पाटील, खा. सुप्रिया सुळे, चेअरमन चंद्रकांत दळवी, अनिल पाटील, भगीरथ शिंदे आणि संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू यांनी त्यांचे कौतुक केले आहे. तसेच नवनाथ बोडखे, प्रमोद तोरणे, बाबासाहेब नाईकवाडी, काकासाहेब वाळुंजकर, सिताराम गारुडकर, हेमलता साबळे, विलास दिघे यांसह सात्रळ परिसरातील ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. अशी माहिती पत्रकार समर्थ वाकचौरे यांनी कळवली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !