जोर्वे गावातील ४११ नागरीकांचा सामूहिक वाढदिवस सोहळा साजरा

संगमनेर Live
0
जोर्वे गावातील ४११ नागरीकांचा सामूहिक वाढदिवस सोहळा साजरा

◻️ चांगल्या परंपरा आणि संस्कृती पुढच्या पिढीपर्यत पोहचवा - बाळासाहेब थोरात

​संगमनेर LIVE | ऐतिहासिक वारसा असलेल्या जोर्वे (ता. संगमनेर) गावात सामाजिक एकतेचा आणि आनंदाचा एक नवा आदर्श निर्माण झाला आहे. गावातील ४११ नागरिक व महिलांचा एकत्रित वाढदिवस मोठ्या उत्साहात व पारंपारिक पध्दतीने साजरा करून जोर्वेकरांनी एक नवीन पायंडा पाडला आहे. या सोहळ्याला ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी उपस्थिती लावत ग्रामस्थांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

​जोर्वे येथील लक्ष्मीआई मंदिराच्या प्रांगणात आयोजित या विशेष कार्यक्रमात वाढदिवस असलेल्या सर्व ४११ नागरिकांना फेटे बांधून, शाल व बुके देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी केक कापून सर्वानी आनंदाने एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, “प्रवरा परिसरातील जोर्वे संस्कृतीचा उल्लेख केवळ राज्यातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर व दिल्ली येथील म्युझियममध्येही केला जातो. या गावाला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे आणि त्याचा प्रत्येकाने अभिमान बाळगला पाहिजे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी स्वातंत्र्यसंग्रामापासून सहकारापर्यतच्या प्रवासात गावाच्या विकासाचा पाया रचला, तोच वारसा आम्ही पुढे चालवत आहोत. गावाच्या विकासात कधीही भेदभाव केला नाही आणि इथल्या मातीशी आमची नाळ घट्ट जोडलेली आहे.”

कुटुंब व्यवस्था आणि संस्कारांवर भाष्य करताना थोरात म्हणाले की, “गावातील सामूहिक सत्काराची ही संकल्पना अत्यंत सुंदर आहे. आपण समृध्द परंपरा जपतानाच पुढची पिढी सक्षम आणि सुसंस्कृत कशी घडेल, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे.” असे आवाहन केले.

यावेळी डॉ. जयश्री थोरात यांनी गावच्या विविध परंपरांचे कौतुक करत उपस्थितांशी संवाद साधला. गावाच्या सर्वागीण प्रगतीसाठी व एकजुटीसाठी आपसातील मतभेद मिटवून एकोप्याने राहण्याचे आवाहन केले.

दरम्यान, ​या उपक्रमामुळे जोर्वे गावने केवळ आपल्या ऐतिहासिक वारशाचाच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी आणि एकतेचाही गौरवशाली इतिहास जपल्याचे दिसून येत आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !