गावच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही - आमदार अमोल खताळ

संगमनेर Live
0
गावच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही - आमदार अमोल खताळ 

◻️ खांबे येथील अनेक कार्यकर्त्याचा शिवसेना पक्षात पक्षप्रवेश

संगमनेर LIVE | “गेल्या चाळीस वर्षात जो विकास झाला नाही, तो महायुती सरकारच्या माध्यमातून केवळ दीड वर्षात आपण करून दाखवला आहे. मतदारसंघाचा चेहरा-मोहरा बदलण्याचे काम सुरू असून, खांबे गावाच्या सर्वागीण विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही," अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली.

​संगमनेर तालुक्यातील खांबे गावातील अनेक कार्यकर्त्यानी गुरुवारी (दि. ४) सायंकाळी आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी सरपंच रविंद्र दातीर, लक्ष्मण जोशी, रमेश काळे, विठ्ठल दातीर, बाबासाहेब दातीर, रामेश्‍वर शिंदे, दिगंबर दातीर, गबाजी कोरडे, भिकाजी वाघ, प्रेमराज बुधे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार खताळ पुढे म्हणाले, “केंद्र आणि राज्यातील महायुतीचे सरकार विकासासाठी कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विकासकामांना मोठी गती मिळाली आहे. खांबे गावातील हा पक्षप्रवेश साकूर पठार भागात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करणारा ठरेल. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकांत या भागात शिवसेनेचा भगवा निश्चितपणे फडकेल,” असा ठाम विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, ​यावेळी पुंजा जोशी, सुखदेव भतांबरे, रावसाहेब भांड, बाबूराव कापडी, बारकू पेकारी, बाबा एकनाथ जोशी, नवनाथ दातीर, एकनाथ दातीर, सुभाष केदार, राजू शेंडगे, बाळासाहेब दातीर, खुशाल वाघ, जनार्दन जोरी, संजय दातीर, ठकाजी दातीर, नामदेव दातीर, ज्ञानेश्‍वर दातीर, रवी जोरी, सोमनाथ शेंडगे, माणिक जोरी, भाऊसाहेब शेंडगे, सखाराम दातीर, रविराज जोशी, पवन जोशी यांच्यासह अन्य कार्यकर्त्यानी शिवसेनेत प्रवेश केला.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !