डॉ. सुजय विखे पाटलांनी पावसामुळे पंक्चरच्या दुकानातचं भरवला ‘जनता दरबार’

संगमनेर Live
0
डॉ. सुजय विखे पाटलांनी पावसामुळे पंक्चरच्या दुकानातचं भरवला ‘जनता दरबार’

◻️​महामार्ग आणि पुतळा कामांबाबत अधिकाऱ्यांना सक्त निर्देश

संगमनेर LIVE (​लोणी) | भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी सोमवारी सकाळी लोणी खुर्द आणि परिसरात सुरू असलेल्या विविध विकासकामांची प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. भर पावसातही त्यांनी विकासकामांचा आढावा घेत, नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या त्वरित मार्गी लावण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

कोल्हार-नांदूर शिंगोटे महामार्गाच्या कामाची पाहणी करताना डॉ. विखे पाटील यांनी कामाचा दर्जा आणि वाहतुकीच्या सुविधेबाबत ग्रामस्थांशी चर्चा केली. पावसाळ्यात नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत, कामात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच, लोणी खुर्द येथील महामार्ग आणि गटर बांधकामाची पाहणी करून तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी पावसाचा जोर असतानाही डॉ. सुजय विखे पाटील यांनी लोणीतील एका पंक्चर दुकानातच थेट ‘जनता दरबार' भरविला. या दरबारामध्ये मतदारसंघातील अनेक नागरिकांनी आपल्या वैयक्तिक आणि सार्वजनिक समस्या मांडल्या. डॉ. विखे पाटील यांनी प्रत्येक नागरिकाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि संबंधित विभागांशी संपर्क साधून प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले.

कोल्हार येथे उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्‍वारूढ पुतळ्याच्या कामाचीही त्यांनी पाहणी केली. या कामात असलेल्या त्रुटी निदर्शनास आणून देत, पुतळ्याचे काम दर्जेदार आणि निश्चित वेळेतच पूर्ण करावे, अशा सक्त सूचना त्यांनी कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !