वारकऱ्यांच्या सेवेसाठी शासन कटिबध्द - आमदार अमोल खताळ

संगमनेर Live
0
वारकऱ्यांच्या सेवेसाठी शासन कटिबध्द - आमदार अमोल खताळ

◻️ पारेगाव येथे श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे ‘ज्ञानोबा-तुकोबा'च्या गजरात स्वागत

​संगमनेर LIVE | रिमझिम पावसाच्या सरी, हवेत दरवळणारा भक्तिरसाचा सुगंध आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’, ‘संत निवृत्तीनाथ महाराज की जय’ असा जयघोष आणि मंगलमय वातावरणात रविवारी (दि. ५) पारेगाव बुद्रुक (ता. संगमनेर) येथे श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पायी पालखी सोहळ्याचे अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्‍वर येथून पंढरपूरकडे मार्गक्रमण करणाऱ्या या पालखी सोहळ्याचे आगमन होताच पारेगाव बुद्रुक परिसर विठ्ठलमय झाला होता. टाळ-मृदुंगाचा अखंड निनाद आणि वारकऱ्यांच्या हरिनामाच्या गजराने संपूर्ण गाव दुमदुमून गेले होते. पालखीच्या स्वागतासाठी गावात आकर्षक सजावट करण्यात आली होती. पालखीचे आगमन होताच भाविकांनी केलेली पुष्पवृष्टी आणि शाळकरी विद्यार्थिनींनी लेझीमच्या तालावर सादर केलेले स्वागत उपस्थितांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले.

यावेळी पालखीचे स्वागत आमदार अमोल खताळ, खासदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले.

​कार्यक्रमादरम्यान वारकरी आणि महिला भाविकांनी पारंपरिक फुगड्या खेळत आनंदोत्सव साजरा केला. भाविकांच्या आग्रहास्तव सौ. नीलम अमोल खताळ यांनीही वारकऱ्यांसमवेत फुगडी खेळत भक्तिरसात तल्लीन होऊन उपस्थितांची मने जिंकली. तसेच त्यांनी वारकऱ्यांशी आपुलकीने संवाद साधून त्यांची विचारपूस केली.

पालखी सोहळ्याचे सलग दुसऱ्या वर्षी स्वागत करण्याचा मान लाभल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आमदार अमोल खताळ म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार वारकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. राज्यातील सर्व दिंड्यांतील वारकऱ्यांना आवश्यक त्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या असून, प्रवासात त्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी शासन पूर्णतः दक्ष आहे.” असे नमूद केले.

दरम्यान, यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश टावरे, जयंत महाराज गोसावी, मोहन बेलापूरकर महाराज, बाळकृष्ण महाराज डावरे, रामकृष्ण महाराज लहवितकर, राहुल महाराज साळुंके, माधवदास महाराज राठी, श्रीपाद महाराज कुलकर्णी, नवनाथ महाराज गांगुर्डे, निलेश महाराज गाढवे, ॲड. सोमनाथ घोटेकर, कांचनताई जगताप, नारायणदादा मुराड, अमर बोंबरे, भीमराज चत्तर, विठ्ठलराव घोरपडे, राजेंद्र सोनवणे, डॉ‌. संतोष डांगे, दत्तात्रय दिघे, रमेश काळे, कैलास गोर्डे, सुरेश दळवी, किशोर गडाख, बाबासाहेब गोरडे, सुनील वाकचौरे, सुनील गडाख, भीमराज गडाख, रावसाहेब गडाख, मधुकर गडाख, सोपन एलके, निलेश गडाख, बाळासाहेब गडाख, रोहित चौधरी, गणेश सानप, अण्णासाहेब काळे आदिसह वारकरी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !