​शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची हकालपट्टी करून माफी मागा - डॉ. अजित नवले

संगमनेर Live
0
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची हकालपट्टी करून देशवासीयांची माफी मागा - डॉ. अजित नवले 

◻️ विद्यार्थ्यांवर दिल्लीत झालेल्या अमानुष लाठीहल्लविरूध्द उद्या राज्यभर निदर्शने 

संगमनेर LIVE (​मुंबई) | दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट परीक्षा घोटाळ्याच्या विरोधात शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) उद्या, गुरुवार दि. २३ जुलै २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र निदर्शने करण्याची हाक दिली आहे. अशी माहिती कॉम्रेड डॉ अजित नवले यांनी दिली.

तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलक विद्यार्थी व विद्यार्थिनींना पोलीसांनी पाशवी पध्दतीनें रक्तबंबाळ करेपर्यंत मारहाण केली असून, केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर झालेली ही कारवाई अत्यंत निंदनीय असल्याचे पक्षाने म्हटले आहे.

​या अत्याचाराविरोधात माकप आपल्या सर्व शाखा, विविध जनसंघटना, धर्मनिरपेक्ष पक्ष आणि आम जनतेला सोबत घेऊन राज्यभर रस्त्यावर उतरणार आहे. यापुढील सर्व परीक्षा पारदर्शक पध्दतीने पार पाडून पेपर लीक व घोटाळे कायमचे रोखण्यासाठी केंद्र सरकारने आपल्या धोरणांमध्ये ठोस बदल करावेत, अशी ठाम मागणी पक्षाने केली आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी धरून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची तत्काळ हकालपट्टी करण्यात यावी आणि आंदोलकांवरील अमानुष हल्ल्याबाबत सरकारने देशवासीयांची माफी मागावी, असे देखील माकपचे नेते कॉम्रेड डॉ. अजित नवले यांनी म्हटले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !