आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्यातून ५५ लाखांचा निधी मंजूर

संगमनेर Live
0
आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्यातून ५५ लाखांचा निधी मंजूर

◻️ नगरपालिकेच्या हद्दीत ‘संत रोहिदास भवन' तर घुलेवाडी व खंदरमाळ येथे सभामंडप

​संगमनेर LIVE | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत संगमनेर शहर आणि तालुक्याच्या सामाजिक व सांस्कृतिक पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी तब्बल ५५ लाख रुपयांचा निधी महायुती सरकारच्या मंजूर झाला आहे. अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली. या मंजूर निधीतून नागरिकांना विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांसाठी आधुनिक आणि कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध होणार आहेत.

​या योजनेअंतर्गत संगमनेर नगरपालिकेच्या हद्दीत सामाजिक, शैक्षणिक व समाजोपयोगी कार्यक्रमांसाठी मध्यवर्ती केंद्र म्हणून संत रोहिदास भवनाच्या उभारणीसाठी २५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यासोबतच घुलेवाडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गृहनिर्माण संस्थेच्या परिसरात विविध बैठका व सार्वजनिक उपक्रमांसाठी १५ लाख रुपये खर्चून सभामंडप उभारण्यात येणार आहे. तसेच पठार भागातील खंदरमाळ गावठाणातील संत रोहिदास मंदिरासमोर धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांच्या सुविधेसाठी १५ लाख रुपयांचा सभामंडप उभारला जाणार आहे. या तिन्ही कामांमुळे परिसरातील नागरी सुविधांना मोठा हातभार लागणार आहे.

​या तिन्ही विकासकामांमुळे संगमनेर शहर आणि तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या व बहुजन समाजाच्या सांस्कृतिक गरजा पूर्ण होण्यास मोठी मदत होणार आहे. संत रोहिदास भवनाच्या माध्यमातून विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन मिळेल, तर घुलेवाडी आणि खंदरमाळ येथील सभामंडपांमुळे स्थानिक नागरिकांची बैठका, धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी कायमस्वरूपी सोय होणार आहे. या प्रकल्पांमुळे परिसराचा सर्वांगीण विकास होण्यासोबतच सामाजिक एकात्मता आणि बंधुभाव अधिक दृढ होईल, असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे.

​“भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून मंजूर झालेल्या या निधीमुळे संत रोहिदास समाजासह सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळतील. या प्रकल्पांमुळे समाजोपयोगी उपक्रमांना चालना मिळून सामाजिक एकात्मता अधिक दृढ होईल. संगमनेरच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजनांमधून जास्तीत जास्त निधी आणण्याचा माझा प्रयत्न यापुढेही असाच सुरू राहील.” अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !